मोठ्या मनाचा भज्जी; खासदारकीचा सगळा पगार बळीराजाच्या लेकीला | Harbhajan Singh News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh News

मोठ्या मनाचा भज्जी; खासदारकीचा सगळा पगार बळीराजाच्या लेकीला

चंडीगढ़ : आम आदमी पार्टीतून राज्यसभा सदस्य झालेला माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतून मिळणारा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भज्जी म्हणाला की राज्यसभेचा सदस्य म्हणून मला माझा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी द्यायचा आहे. मी माझ्या देशाच्या भल्यासाठी योगदान देण्यासाठी सामील होत आहे. मी यापुढे जे काही करू शकतो ते करेन जय हिंद. (Harbhajan Singh News)

हरभजन सिंग यांची पंजाबमधून राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा मूळचा जालंधरचा रहिवासी आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. भज्जीने डिसेंबर 2021 मध्ये 23 वर्षांची क्रिकेट कारकीर्द संपवली आहे. दोन वेळा विश्वविजेत्या भारतीय संघचा तो भाग देखील होता.

हरभजन सिंगचा निवृत्तीनंतर नवज्योत सिंग सिद्धूसोबतचा एक फोटो व्हायरल होत होता. त्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे बोलले जात होते. 41 वर्षीय हरभजनची क्रिकेट कारकीर्द खुपच चांगली राहिली आहे. भारताला अनेक हरत्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. क्रिकेटशिवाय हरभजनने अभिनयातही हात आजमावला आहे. गेल्या वर्षी हरभजन फ्रेंडशिप या तमिळ चित्रपटात दिसला होता.

हरभजन सिंगने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करुण कारकिर्दीला सुरवात केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो अनिल कुंबळे, कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे. हरभजन सिंगने एकूण 417 विकेट घेतल्या आहे.

Web Title: Harbhajan Singh Contribute Rajya Sabha Salary For Farmers Daughters Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top