Pak vs Sa World Cup : 'खराब अंपायरमुळे पाकिस्तान हरला...' भारतीय दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Pak vs Sa World Cup
Pak vs Sa World Cup SAKAL

Bad Umpiring Cost Pakistan Harbhajan Singh Question on Umpires Call : मैदान बदलले... विरोधक बदलले... पण बदलले नाही पाकिस्तानचे निकाल. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानला सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी आफ्रिकेविरुद्ध चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या अतिशय रोमांचक सामन्यात पाकिस्तानला एक विकेटने पराभव पत्करावा लागला.

मात्र, पाकिस्तानच्या पराभवावरून खळबळ उडाली. सामन्यातील खराब अंपायरिंगमुळे हा गदारोळ झाला, त्याचा संबंध पाकिस्तानच्या पराभवाशीही जोडला जात आहे. केवळ पाकिस्तान नाही तर भारतीय दिग्गज खेळाडू ही हा मुद्दा मांडताना दिसत आहे.

Pak vs Sa World Cup
World Cup 2023 Points Table : पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा धक्का! पण बाबर सेनेचं आव्हान कायम?

खरे तर संपूर्ण सामन्यात खराब अंपायरिंगची उदाहरणे 3 ते 4 वेळा पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 46व्या षटकात हा राडा झाला. तबरेझ शम्सी स्ट्राइकवर होता तर हारिस रौफ गोलंदाजी करत होता. रौफच्या षटकातील शेवटचा चेंडू शम्सीच्या पॅडला बॉल लागला. पण अंपायरने शम्सीला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याने गोंधळ उडाला.

पाकिस्तानने डीआरएस घेतला, ज्यात मैदानावरील पंचांचा निर्णय अखेर धरला. यानंतरच वादाला तोंड फुटले. वादाचे कारणही तेच होते कारण तो सामन्याचा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. दक्षिण आफ्रिकेची ती शेवटची विकेट मिळाली असती तर तो सामना पाकिस्तानने जिंकला असता. पण हे होऊ शकले नाही.

पाकिस्तानमधील स्पोर्ट्स शोमध्ये वसीम अक्रम आणि मिसबाह-उल-हक या दिग्गज क्रिकेटपटूंनी सामन्यातील खराब अंपायरिंगचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली. मिसबाह म्हणाला की, अंपायरचा कॉल हा मोठा मुद्दा बनत आहे, आयसीसीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. माझ्या मते अंपायरचा कॉल सारख्या गोष्टी रद्द केल्या पाहिजे.

खराब अंपायरिंगमुळे पाकिस्तानचा पराभव - हरभजन

खराब अंपायरिंगच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या दिग्गजांना भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगचाही पाठिंबा मिळाला. भज्जीने थेट सोशल मीडियावर लिहिले की, खराब अंपायरिंगचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागले आहेत. आयसीसीने याकडे लक्ष द्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com