
हरभजन म्हणाला; मी निवृत्ती आधीच घेतली होती पण...
हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. ही घोषणा त्याने ट्विटद्वारे केली. या ट्विटमध्ये त्याच्या युट्यूब व्हिडिओची लिंक दिली आहे. या व्हिडिओत हरभजनने (Harbhajan Singh) आपल्या क्रिकेट कारकिर्दिचा गोषवारा सांगत आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींचे आभार मानले. या व्हिडिओत त्याने मी माझ्या निवृत्तीची घोषणा काही वर्षांपूर्वीच करणार होतो असे सांगितले.
या व्हिडिओच्या सुरुवातीला हरभजन म्हणतो, 'माझ्या २५ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात जलंदरच्या (Jalandar) गल्लीतून झाली. तेथून मी आज इथंपर्यंत पोहचलो आहे. ज्यावेळी मी भारताची जर्सी घालायचो त्यावेळी मला आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा मिळालची.'(Harbhajan Singh Retirement Announcement)
हरभजन (Harbhajan Singh) पुढे म्हणाला, 'माझ्या क्रिकेट कारकिर्दितील सर्वोच्च क्षण म्हणजे ज्यावेळी मी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बंगळुरु कसोटीत हॅट्ट्रिक घेतली होती. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा मी पहिलाच गोलंदाज ठरलो होतो. या दौऱ्यात मी ३२ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर २००७ ला टी २० वर्ल्डकप आणि २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात असण्याचे भाग्य मला लाभले.'
हरभजनने आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबतही या व्हिडिओत माहिती दिली. तो म्हणाला की, 'मी गेल्या अनेक वर्षापासून निवृत्तीचा विचार करत होतो. मानसिक दृष्ट्या मी काही वर्षापूर्वीच निवृत्त झालो होतो. मात्र हा निर्णय कसा घोषित करावा हे कळत नव्हते. मी आयपीएलच्या गेल्या हंगामातच निवृत्ती घेणार होतो. मात्र केकेआर बरोबरच्या करारामुळे मी ही घोषणा करु शकलो नाही.' (Harbhajan Singh Retirement Announcement)
हेही वाचा: सट्टेबाजी कायदेशीर करा, शास्त्रींची मोदी सरकारकडे मागणी
क्रिकेटच्या मैदानातून निवृत्तीची संधी न मिळालेल्या हरभजनने याबाबत निवृत्तीच्या या व्हिडिओ खंतही व्यक्त केली. तो म्हणाला, 'भराताच्या जर्सीतूनच निवृत्ती घेण्याची माझी इच्छा होती. मात्र नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते.'
हरभजनने आपले गुरु संत हरचरण सिंगजी यांचेही आभार मानले. तो म्हणाला की संत हरचरण सिंगजींच्या आशीर्वादामुळेच आयुष्यात मी इतकी प्रगती करु शकलो. याचबरोबर त्याने आपल्या आई वडिलांचेही आभार मानले. तो म्हणाला, 'माझ्या आई वडिलांनी माझ्या कारकिर्दिसाठी प्रचंड संघर्ष केला आहे. पुढच्या जन्मीही याच आई वडिलांच्या पोटी जन्म मिळावा ही माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे.'
त्याने या व्हिडिओत आपल्या पत्नी बाबत बोलताना सांगितले की, 'माझ्या वाईट आणि चांगल्या काळात माझी पत्नी गीता माझ्यासोबत होती. आता मी तिला वेळ देत नाही ही तक्रार करण्याची संधी तिला देणार नाही. कारण माझ्याकडे आता भरपूर वेळ आहे.' (Harbhajan Singh Wife)
हेही वाचा: कुलदीपची प्रशंसा अश्विनला टोचली याचा मला आनंदच : शास्त्री
व्हिडिओत शेवटी हरभजनने त्याच्या यशात वाटा उचलणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला, 'माझ्या यशात सर्व संघातील सहकारी आणि बीसीसीआय (BCCI), पंजाब क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचेही आभार. मी भारतीय क्रिकेटची खेळाडू म्हणून सेवा केली आहे. मी आज जे काही आहे ते क्रिकेटमुळेच आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटची मला कोणत्याही स्वरुपात सेवा करण्याची संधी मिळाली तर मी ती खूषीने करेन. आता माझ्या आयुष्यातील वेगळा टप्पा सुरु होत आहे. तुमचा हरभजन सिंग या परीक्षेचा सामना करण्यास तयार आहे.'
Web Title: Harbhajan Singh Says I Wanted To Announce Retirement Many Years Ago
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..