
हार्दिक आणि नताशाने अनेक पार्ट्यांना एकत्र हजेरी लावली आहे मात्र, त्यांनी कधीच आपले नाते स्वीकारले नाही. आता मात्र, दोघांनीही आपले नाते स्वीकारले आहे.
हार्दिकनं दिली प्रेमाची कबूली, बघा त्याची हॉट गर्लफ्रेंड
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या अनेक वेळा त्याच्या गर्लफ्रेंड्समुळे चर्चेत असतो. यावेळीसुद्धा तो त्याच्या गर्लफ्रेंड्समुळेच चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी हार्दिकने त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. त्याने बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅमकोविचसोबतचे नाते सर्वांसमोर मान्य केले आहे.
हार्दिकने त्याची गर्लफ्रेंड नताशासोबत फोटो टाकत नवीन वर्षाची सुरवात तिच्यासोबत करत असल्याचे कॅप्शन टाकले आहे. त्याने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हो फोटो शेअर केला आहे. त्याने स्वत: यापूर्वी कधीच तिच्यासोबत फोटो शेअर केला नव्हता मात्र, नवीन वर्षाचे औचित्य साधून त्याने सर्वांसमोर आपल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.
हार्दिक आणि नताशाने अनेक पार्ट्यांना एकत्र हजेरी लावली आहे मात्र, त्यांनी कधीच आपले नाते स्वीकारले नाही. आता मात्र, दोघांनीही आपले नाते स्वीकारले आहे.
Web Title: Hardik Pandya Confess His Relationship Natasha Stankovic
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..