Hardik Pandya : पंत खेळलाच मात्र हार्दिक पांड्याने इतिहास रचला

Hardik Pandya First Indian Player Who Score 50+ Runs Took 4+ Wicket in All Three Cricket Format Against England
Hardik Pandya First Indian Player Who Score 50+ Runs Took 4+ Wicket in All Three Cricket Format Against Englandesakal

मँचेस्टर : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवर भारताने इंग्लंडचा (England Vs India) 5 गडी राखून पराभव करत वनडे मालिका 2 - 1 ने खिशात टाकली. भारताने मालिकेतील पहिला सामना 10 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत सामना 100 धावांनी जिंकला. त्यामुळे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना निर्णयाक ठरला. या सामन्यात भारताने इंग्लंडचे 260 धावांचे आव्हान 42.1 षटकात पाच फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिकेवर कब्जा केला.

भारताच्या विजयात 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतचा (Rishabh Pant) मोठा वाटा आहे. मात्र त्याच्या जोडीला पाचव्या विकेटसाठी 133 धावांची झुंजार भागीदारी रचणाऱ्या हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) देखील तितकाच मोठा वाटा आहे. हार्दिकने 55 चेंडूत 71 धावांची खेळी केली. याचबरोबर त्याने इंग्लंडचे 4 फलंदाज बाद करून इंग्लंडला 259 धावात रोखले.

Hardik Pandya First Indian Player Who Score 50+ Runs Took 4+ Wicket in All Three Cricket Format Against England
Rishabh Pant : पंतने विलाला दिला '4,4,4,4,4,1' असा फॅन्सी फोन नंबर

सचिन, सौरभ, युवराजच्या पंक्तीत आता हार्दिक

हार्दिक पांड्याने तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत ऐतिसहासिक कामगिरी केली. तो वनडेमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि 4 किंवा 4 पेक्षा अधिक विकेट घेणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी भारताकडून अशी कामगिरी के. श्रीकांत, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि युवराज सिंगने केली होती. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याने अजून एक मोठा रेकॉर्ड केला.

Hardik Pandya First Indian Player Who Score 50+ Runs Took 4+ Wicket in All Three Cricket Format Against England
Rishabh Pant : पंतला स्वातंत्र्य द्या! तंत्र, सावधपणाच्या पिंजऱ्यात अडकवू नका

हार्दिकचे इंग्लंडविरूद्ध खास रेकॉर्ड

हार्दिक पांड्याने इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात 55 चेंडूत 71 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत 7 षटकात 24 धावा देत 4 विकेटही घेतल्या. हार्दिक पांड्याने इंग्लंड विरूद्ध तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये अर्धशतकी खेळी आणि 4 विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला.

हार्दिकने 2018 मध्ये नॉटिंगहम कसोटीत इंग्लंड विरूद्ध नाबाद 52 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर 28 धावा देऊन 5 विकेट देखील घेतल्या होत्या. याचबरोबर नुकत्याच झालेल्या टी 20 मालिकेत त्याने साऊथम्पटनमध्ये 51 धावांची खेळी केली होती. तर 33 धावात 4 विकेट घेतल्या होत्या. (Score 50+ Runs Took 4+ Wicket in All Three Cricket Format)

हार्दिक पांड्या तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात 50 धावा आणि 4 विकेट घेणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजने अशी कामगिरी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com