Wi vs Ind: 'काही मूलभूत गरजांची...' विंडीज क्रिकेट बोर्डाच्या निष्काळजीपणावर कर्णधार पांड्या संतापला

Hardik Pandya Wi vs Ind Series
Hardik Pandya Wi vs Ind Series

Hardik Pandya Wi vs Ind Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने विंडीज संघाचा 200 धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने हार्दिकने संघाची धुरा सांभाळली. सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने मूलभूत गरजांबाबत विंडीज क्रिकेट बोर्डावर नाराजी व्यक्त केली.

Hardik Pandya Wi vs Ind Series
Ashes ball-change controversy : पराभवाचे खापर बदललेल्या चेंडूवर! कांगारूचे आजी-माजी खेळाडू लागले रडायला

सामन्यानंतर हार्दिक पांड्याने विंडीज क्रिकेट बोर्डाकडे सुविधा सुधारण्याची मागणी केली, “आम्ही खेळलेल्या सर्वोत्तम मैदानांपैकी हे एक आहे. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही वेस्ट इंडिजमध्ये येऊ तेव्हा गोष्टी चांगल्या होऊ शकतात.

तो पुढे म्हणाला, “प्रवासासारख्या गोष्टींवर, आशा आहे की वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड याकडे लक्ष देईल आणि कोणतीही समस्या नाही याची खात्री करेल. आम्ही चैनीच्या वस्तूंची मागणी करत नाही पण काही मूलभूत गरजांची काळजी घेतली पाहिजे.”

Hardik Pandya Wi vs Ind Series
Asian Hockey Champions : हॉकीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यांसाठी रणनीती

भारताने वेस्ट इंडिजचा 200 धावांनी पराभव करत मालिका खिशात घातली. शार्दुल ठाकूरने जेडेन सेल्सला एका धावेवर बाद करून वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला. 352 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ 151 धावाच करू शकला आणि सामना 200 धावांनी गमावला. या मालिकेतील पहिला सामना भारताने पाच गडी राखून जिंकला होता. त्याचवेळी वेस्ट इंडिजने दुसरा सामना सहा गडी राखून जिंकून बरोबरी साधली. भारताने तिसरा सामना 200 धावांनी जिंकून मालिका आपल्या नावावर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com