Hardik Pandya | हार्दिक पांड्या निवृत्ती घेणार?

पाठीच्या दुखापतीने त्रस्त झालेला पांड्या कसोटीतून निवृत्ती घेणार?
Hardik Pandya
Hardik Pandyaesakal

नवी दिल्ली : भारतीय संघाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सततच्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त झाला आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये देखील याच पाठीच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकला नव्हता. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा भारतीय संघात एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत होता. मात्र दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याचे भारतीय संघातील स्थानही डळमळीत झाले आहे. अजूनही तो या दुखापतीतून (Hardik Pandya Injury) पूर्णपणे सावरलेला नाही. दरम्यान, त्याने पहिल्यांदा कसोटीमधील आणि आता मर्यादित षटकांच्या सामन्यातील टीम इंडियामधील आपले स्थान गमावले आहे. (Hardik Pandya May be Retire From Test Cricket)

Hardik Pandya
Virat Kohli : 'कडक' बीसीसीआय अध्यक्षांनी 'रागीट' विराटचे पंख छाटले

संघातून वगळण्यात आलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. तो आता आपले सगळे लक्ष एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटवर केंद्रीत करणार आहे. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) भारताकडून शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध खेळला होता. त्याने २०१७ मध्ये श्रीलंकाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.

Hardik Pandya
डायरेक्ट मॅचला येऊन चालणार नाही; पांड्या बंधूतील एक आला अन्...

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका क्रीडा विषयक वेबसाईटशी बोलताना संगितले की, 'हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनेक दिवसापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याबाबत त्याने जाहीररित्या काही सांगितलेले नाही. मात्र तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. त्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर फोकस करता येईल. तसंही हार्दिक पांड्याचा बीसीसीआय कसोटी क्रिकेटसाठी विचार करत नाहीये. ही भारतासाठी फारशी चांगली गोष्ट नाही. मात्र आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.'

हार्दिक पांड्याने ११ कसोटी सामने (Test Cricket) खेळले आहेत. फलंदाजीत त्याने एक शतक ठोकत ५३२ धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत त्याला १७ विकेट घेण्यात यश आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com