Hardik Pandya-Natasa Stankovic : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाची 'पांड्या'बाबतची 'ती' पोस्ट चर्चेत; इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत....

Hardik Pandya–Natasa Stankovic Divorce Rumours : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाबाबत बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत आहेत.
Hardik Pandya Natasa Stankovic Photo
Hardik Pandya Natasa Stankovic Photosakal

Hardik Pandya-Natasa Stankovic Update : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाबाबत बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत आहेत. पण दोघांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. दरम्यान, नताशाने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सूचित केले की ती अद्याप हार्दिक पांड्यापासून वेगळी झालेली नाही.

Hardik Pandya Natasa Stankovic Photo
Suni Chhetri Retirement : 'माझी निवृत्ती महत्त्वाची नाही तर देशासाठी....' अखेरच्या सामना खेळण्यासाठी छेत्री उतरणार मैदानात

नताशाने बुधवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. ज्यामध्ये ती तिच्या पाळीव कुत्र्यासोबत दिसली. कुत्र्याने स्वेटर घातले होते ज्यावर पांडा दिसत आहे. नताशाच्या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये कुत्र्याचे नाव ‘Baby Rover Pand(y)a' असे लिहिले आहे. या स्टोरीत नताशाने केवळ पांड्या हे आडनाव वापरले नाही तर ती हार्दिकच्या घरात राहात असल्याचेही सूचित केले आहे.

Natasa Stankovic Instagram Story
Natasa Stankovic Instagram Storysakal
Hardik Pandya Natasa Stankovic Photo
USA vs Pakistan : पाकिस्तानला धक्का देण्यासाठी मैदानात उतरणार अमेरिका! किती वाजता रंगणार सामना?

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान नताशा स्टॅनकोविच सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या कामाशी संबंधित पोस्ट करण्यासोबतच ती तिचा मुलगा आगसत्यासोबतही पोस्ट शेअर करत आहे. हार्दिक आणि नताशा अजूनही एकमेकांना फॉलो करत आहेत. इतकंच नाही तर हार्दिकच्या कुटुंबातील सदस्यही नताशाला फॉलो करत आहेत आणि तिच्या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत.

Hardik Pandya Natasa Stankovic Photo
Rohit Sharma Injury : पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? कर्णधाराच्या दुखापतीमुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये

हार्दिक पांड्याने जानेवारी 2020 मध्ये नताशा स्टॅनकोविचशी लग्न केले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांत दोघेही आई-बाबा झाले. त्याचा मुलगा आगसत्याचा जन्म झाला. यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. पण या वर्षी फेब्रुवारीपासून या दोघांनीही एकही पोस्ट शेअर केलेली नाही आणि त्यामुळेच त्यांच्या घटस्फोट होण्याच्या बातम्या येऊ लागल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com