दादाचं ऐकलं नाही, आता पांड्याचं कसं व्हायचं!

Hardik Pandya
Hardik PandyaSakal

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा आपल्या एका निर्णयामुळे चर्चेत आला आहे. त्याने देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत महत्त्वाची आणि प्रतिष्ठीत रणजी ट्रॉफी 2022 (Ranji Trophy 2022) स्पर्धेतून माघार घेतली आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात हार्दिक पांड्याचे नाव नाही.

व्हाईट बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करुन टीम इंडियात (Team India) कमबॅक करण्यासाठी हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) हा निर्णय घेतला आहे. बडोदा संघाने केदार देवधरकडे संघाची धूरा सोपवली आहे. 10 फेब्रुवारीपासून रणजी ट्रॉफीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

पांड्यानं गांगुलीसह निवड समितीच्या सल्ल्याकडे केलं दुर्लक्ष

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हार्दिक पांड्याला रणजीत खेळण्याचा सल्ला दिला होता. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. त्याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सौरव गांगुली आणि बीसीसीआय निवडसमितीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करा आणि टीम इंडियात जागा मिळवा, असे संकेत दिले आहेत. ही गोष्टी हार्दिक पांड्याच्या लक्षात आल्याचे दिसत नाही. गांगुली आणि बीसीसीआय निवड समितीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे टीम इंडियात कमबॅक करण्याच्या त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सध्याच्या घडीला भारतीय संघात पांड्याच्या जागी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे रणजीतून माघार घेणं हार्दिक पांड्याला चांगलेच महागात पडू शकते.

Hardik Pandya
IND vs PAK: अवघ्या काही तासांत खपली भारत-पाक सामन्याची तिकीट

टी 20 वर्ल्ड कपनंतर पांड्या भारतीय संघाबाहेर

हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपपासून संघाबाहेर आहे. पाठिच्या दुखापतीतून सावरुन दमदार कमबॅक करण्यासाठी त्याने स्वत: राष्ट्रीय संघ निवडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. रेड बॉलवर न खेळता व्हाईट बॉलवर खेण्यावर भर देत तो कसोटीला अलविदा करण्याचे संकेतही देताना दिसते.

Hardik Pandya
माझी सपोर्ट सिस्टम ढासळली; वडिलांच्या आठवणीत रैना भावूक

कसोटीला 'बायबाय' करण्याचे संकेत

हार्दिक पांड्या डिसेंबबर 2018 पासून भारतीय कसोटी संघाचा भाग राहिलेला नाही. दुखापतीमुळे त्याने आता केवळ मर्यादित क्रिकेटवर फोकस करण्याचे ठरवल्याचे दिसते. त्यामुळेच त्याने रणजी स्पर्धेत खेळणं टाळलं आहे. पण सध्याच्या घडीला मिळेल त्या स्पर्धेत खेळून टीम इंडियातील दावेदारी भक्कम करण्यावर त्याने भर द्यायला हवा होता. सध्याच्या घडीला तो याविरुद्ध काहीतरी करताना दिसतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com