Hardik Pandya : 'कॅप्टन' हार्दिकने स्वतः गोलंदाजी न करण्याचं सांगितलं कारण, म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Bowling

Hardik Pandya : 'कॅप्टन' हार्दिकने स्वतः गोलंदाजी न करण्याचं सांगितलं कारण, म्हणाला...

Hardik Pandya Bowling : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडमधील दुसरा टी 20 सामना तब्बल 65 धावांनी जिंकत वर्ल्डकपमधील सेमी फायनल सामन्यातील पराभवाच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. भारताने प्रथम फंलदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या झंजावाती 111 धावांच्या जोरावर 191 धावांपर्यंत मजल मरली. मात्र गोलंदाजांनीही ओल्या मैदानावर देखील प्रभावी मारा करत न्यूझीलंडला 126 धावात गुंडाळले. दरम्यान, या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने एकही षटक गोलंदाजी केली नाही.

हेही वाचा: IND vs NZ : वर्ल्डकपमधील 'बेंच'वरील खेळाडूंनी न्यूझीलंडमध्ये मैदान गाजवलं

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याला भारताच्या विजयाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. याचबरोबर आजच्या सामन्यात स्वतः गोलंदाजी का केली नाही याबाबत देखील त्याला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्याने 'मी खूप गोलंदाजी केली आहे. मला भविष्यासाठी अजून काही गोलंदाजीचे पर्याय चाचपून पहायचे आहेत. प्रत्येकवेळी ही गोष्ट कामी येईल असे नाही मात्र मला फलंदाज जो थोडी गोलंदाजी देखील करू शकतो असे पर्याय चाचपून पहायचे आहेत.'

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, 'मी संघातील खेळाडूंनी व्यावसायिक व्हावे अशी अपेक्षा करत आहे. मी त्यांना खेळाचा आनंद घेण्याची संधी देऊ इच्छितो. संघात एक हसतं खेळतं वातावरण असावं. संघातील अनेक खेळाडूंना मी एकमेकांच्या यशात आनंदी होताना पाहिले आहे. ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. मी अंतिम 11 च्या संघात सर्वांना संधी देऊ शकेन की नाही हे मला माहिती नाही. कारण आता फक्त 1 सामना राहिला आहे.'

हेही वाचा: Indian Football : भारतीय फुटबॉलला फिक्सिंगची कीड; पाच क्लब CBI च्या रडारवर

हार्दिकने गोलंदाजांनाही एक खास सल्ला दिला होता. हार्दिक म्हणाला की, 'गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली. तुम्ही आक्रमक माईंडसेटने खेळणे गरजेते असते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक चेंडूवर विकेट काढणे गरजेचे असते. मात्र गोलंदाजी करताना तुम्ही आक्रमक असणं महत्वाचं असतं. मैदान ओलं होतं त्यामुळे गोलंदाजांच विशेष कौतुक.'