
IND vs NZ: न्यूझीलंडला खरी झुंज तर एकट्या सुंदरनेच दिली; पांड्या हे काय बोलून गेला
India vs New Zealand 1st T20 : अखेर न्यूझीलंडला भारत दौऱ्यावर पहिला विजय मिळाला. रांचीमध्ये झालेल्या 3 टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात किवी संघाने भारताचा 21 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 177 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही आणि 20 षटकांत केवळ 159 धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या 19 षटकात केवळ 149 धावा केल्या होत्या. मात्र अखेरच्या षटकात संपूर्ण खेळच उलटला. अर्शदीप सिंगच्या या षटकात डॅरिल मिशेलने 3 षटकार आणि 1 चौकार मारून एकूण 27 धावा केल्या आणि न्यूझीलंडची धावसंख्या 176 धावांपर्यंत पोहोचवली. शेवटी या 27 धावा भारताला जड झाल्या. वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकानंतरही भारताचा पराभव झाला.
रांची टी-20 मधील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, 'खेळपट्टीचा मूड असा असेल असा कोणीही विचार केला नव्हता. दोन्ही संघांना धक्का बसला. पण न्यूझीलंडने चांगले क्रिकेट खेळले. नवीन चेंडू जुन्यापेक्षा जास्त टर्न घेत होता. पण जोपर्यंत मी आणि सूर्या फलंदाजी करत होतो. त्यामुळे आम्ही जिंकू अशी आशा होती. 177 धावांची विकेट आहे असे मला वाटले नव्हते. आम्ही गोलंदाजीत 25 धावा अधिक दिल्या. युवा खेळाडू या पराभवातून धडा घेत आहे.
वॉशिंग्टन सुंदरने या सामन्यात चेंडू आणि बॅटनी चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या 4 षटकात 22 धावा देऊन 2 विकेट घेतल्या आणि नंतर 28 चेंडूत 50 धावा ठोकल्या. सुंदरचे कौतुक करताना पंड्या म्हणाला, 'वॉशिंग्टनने ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी केले, ते भारत विरुद्ध न्यूझीलंड नसून वॉशिंग्टन विरुद्ध न्यूझीलंड असल्यासारखे वाटत होते. आम्हाला अशा व्यक्तीची गरज होती जी फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकेल, ज्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल. सुंदर आणि अक्षर अशीच प्रगती करत राहिल्यास भारतीय क्रिकेटला खूप मदत होईल. दुसरा सामना 29 जानेवारीला लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला जाणार आहे.