निरगुडसर : श्रीलंका (कोलंबो) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेमध्ये (International Masters Games Competition) खडकीफाटा (ता. आंबेगाव) येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात (Harishchandra Thorat) यांनी धावणे आणि चालणे क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदक पटकावली आहेत. गेल्या ११ वर्षात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीयसह मॅरेथॉन अशा एकूण १२० स्पर्धेत या ७१ वर्षाच्या तरुण धावपट्टूने १३७ पदकांची कमाई केली आहे.