Harmanpreet Kaur VIDEO : सामना खेळणारच नव्हती... अंजूम चोप्राच्या खांद्यावर फुटला हरमनच्या अश्रूंचा बांध

Harmanpreet Kaur Anjum Chopra
Harmanpreet Kaur Anjum Chopraesakal

Harmanpreet Kaur IND vs AUS : केपाटाऊनमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापासून थोडक्यात चुकला. महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायलन सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव केले. हा सेमी फायनल सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला दुखापती आणि आजारपणाचे ग्रहण लागले होते.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर सामना खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र हरमनप्रीत खेळली अन् भारताला विजय मिळवून देण्यासाठी झुंजली देखील. हरमनप्रीत कौरने 52 धावांची झुंजार खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी ती धावबाद झाली अन् भारताच्या हातून सामना निसटला. सामना झाल्यानंतर हरमनप्रीत भारताची माजी कर्णधार अंजून चोप्राला मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर आपल्या डोळ्यातील अश्रू सांडले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हरमनप्रीत भावूक झाल्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत हरमन समालोचक अंजूम चोप्राला मिठी मारत रडताना दिसत आहे. अंजुम चोप्राची देखील समालोचन करत असताना अशीच अवस्था झाली. भावूक झालेल्या चोप्राच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.

या व्हिडिओ अंजूम चोप्रा म्हणाली की हरमनप्रीत आजचा सामना खेळण्याची शक्यता नव्हती. तरी देखील हरमन मैदानावर उतरली. ती मागे हटणारी खेळाडू नाही. तिने आजच्या सामन्यात सीमारेषेवर फिल्डिंग केली. फलंदाजी करताना अर्धशतक ठोकत सामना जवळपास जिंकून दिला होता.

भारताने ऑस्ट्रेलियाच्या 173 धावांचे आव्हान पार करताना झुंजार वृत्ती दाखवत 167 धावांपर्यंत मजल मारली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी करत हरमनला चांगली साथ दिली. मात्र पाचवेळा टी 20 वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला. भारताने या सामन्यात ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. याचा मोठा फटका भारताला बसला.

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com