Indian Hockey : भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रीतकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian hockey team captain

Indian Hockey : भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रीतकडे

भुवनेश्वर : एफआयएच हॉकी प्रो लीगमधील न्यूझीलंड आणि स्पेनविरुद्धच्या सामन्यांकरिता भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत सिंगची निवड करण्यात आली आहे. भारताचे हॉकी प्रो लीगमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात न्यूझीलंड आणि स्पेनबरोबर चार सामने होणार आहेत. या सामन्यांकरिता हरमनप्रीतला उपकर्णधार म्हणून मनप्रीत सिंगची साथ लाभणार आहे.

या संघनिवडीबद्दल अधिक माहिती देताना हॉकी इंडियाने म्हंटले आहे की, ‘आम्ही आगामी सामन्यांकरता अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू यांच्यात समतोल साधायचा प्रयत्न केला आहे. तसेच संघात अजून नेतृत्वगुण तयार व्हावेत म्हणून आम्ही हरमनप्रीतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. संघात मोहम्मद राहील मोहसीन आणि एस. कार्ती या तरुण खेळाडूंचासुद्धा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ त्यांचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध २८ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. भारताचा ३० ऑक्टोबर रोजी स्पेन विरुद्ध सामना होणार आहे. न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा सामना ४ नोव्हेंबर रोजी होणार असून; स्पेन विरुद्धचा दुसरा सामना ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लढती भुवनेश्‍वर येथे होतील.

भारतीय हॉकी संघ पुढीलप्रमाणे :

गोलरक्षक : कृष्णन बहादूर पाठक,

पी. आर. श्रीजेश.

बचाव फळी : जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, मनदीप मोर आणि नीलम संजीप.

मधली फळी : सुमीत, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, मोइरंगथेम रबीचंद्र सिंग, शमशेर सिंग, नीलकांता शर्मा, राजकुमार पाल आणि मोहम्मद राहिल मौसीन.

आक्रमक फळी : एस. कार्ती, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक आणि सुखजीत सिंग.

टॅग्स :sportshockeyMen's hockey