Brijbhushan Controversy: बृजभूषण यांच्यावरील लैंगिक अत्याचारावरील आरोपाचा चेंडू मेरी कोमच्या कोर्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MC Mary Kom

Brijbhushan Controversy: बृजभूषण यांच्यावरील लैंगिक अत्याचारावरील आरोपाचा चेंडू मेरी कोमच्या कोर्टात

Brijbhushan Controversy : लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दरम्यान, खेळाडूंच्या आंदोलनानंतर आणि गंभीर आरोपांनंतर केंद्राकडून कुस्ती संघटनेचे कामकाज पाहण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी ऑलिम्पियन आणि माजी विश्वविजेती बॉक्सर खेळाडू मेरी कोमवर देण्यात आली आहे.

हेही वाचा: WFI Chief vs Wrestlers : वाद आणखी पेटणार! आरोप करणाऱ्यांविरोधात बृजभूषण सिंग यांची याचिका

या समितीच्या सदस्यांमध्ये ऑलिम्पियन कुस्तीपटू योगेश्वर दत्त, द्रोणाचार्य पुरस्कार विजेती तृप्ती मुरुगंडे, कॅप्टन राजगोपालन, राधा श्रीमन यांचा समावेश असणार आहे. केंद्राकडून स्थापित करण्यात आलेली ही समिती कुस्ती संघटनेचे काम पाहणार आहे.

हेही वाचा: Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना SC चा मोठा दिलासा

कुस्तीपटूंच्या आरोपानंतर क्रिडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांना कुस्ती संघटनेच्या कामकाजापासून चार आठवडे दूर राहण्यास सांगितले आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावर काम करणार नसून, त्यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांची चौकशी केली जाणार असल्याचे ठाकूर म्हणाले.  

हेही वाचा: Prakash Ambedkar : मोदींनी स्वपक्षातीलही नेतृत्त्व संपवलं; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

दरम्यान, कुस्ती महासंघाचे कामकाज मेरी कोमला अध्यक्ष म्हणून काम पाहतील कोम यांच्या अध्यक्षेतील खालील समितीत पाच जण काम करतील ही देखरेख समिती कुस्ती संघटनेचे दररोजचे काम पाहणार असल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :wrestlerMary Kom