International Cricket Helmet : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेल्मेट सक्तीचे; आयसीसीचा नियम

वेगात येणाऱ्या चेंडूंमुळे इजा होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आयसीसीने आपल्या नियमात काही बदल केले आहेत.
Umpire
Umpiresakal
Summary

वेगात येणाऱ्या चेंडूंमुळे इजा होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आयसीसीने आपल्या नियमात काही बदल केले आहेत.

मुंबई - वेगात येणाऱ्या चेंडूंमुळे इजा होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आयसीसीने आपल्या नियमात काही बदल केले आहेत. त्यानुसार वेगवान गोलंदाजी खेळत असताना फलंदाजाने हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे एवढेच नव्हे तर यष्टींच्या जवळ यष्टीरक्षण करणाऱ्या आणि फलंदाजच्या जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्यांनीही हेल्मेट वापरलेच पाहिजे असा नवा निमय आयसीसीने केला आहे.

सौरव गांगुली अध्यक्ष असलेल्या क्रिकेट समितीने खेळाच्या नियमात काही बदल केले आहेत. या सर्व नियमांची १ जून २०२३ पासून इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यातून अंमलबजावणी होणार आहे.

फलंदाज-यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांची सुरक्षा महत्वाची आहेच त्यामुळे चेंडू लागण्याची परिस्थिती असताना त्यांनी हेल्मेट वापरलेच पाहिजे असा महत्वाचा बदल होणार आहे.

सॉफ्ट सिग्नल कालबाह्य

प्रामुख्याने झेलचीत संदर्भात निर्णय देताना मैदानावर पंत साशंक असतात अशा ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागतात, परंतु त्यावेळी त्यांनी दिलेल्या निर्णयाला सॉफ्ट सिग्नल असे म्हणतात. आता हा सॉफ्ट सिग्नल कालबाह्य असेल आणि टिव्ही पंच देईल तो निर्णय अंतिम असेल.

फ्रिहीटवर धाव ग्राह्य

ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्यात अंतिम षटकात विराट कोहलीने फ्रीहीटवर चेंडू यष्टींना लागून गेल्यानंतरही धाव घेतली होती. त्यावर पाककडून प्रतिक्रिया उमटल्या होत्या, परंतु अशा प्रकारची धाव नियमानुसार असणार यावर सौरव गांगुली यांच्या क्रिकेट समितीने शिक्कामोर्तब केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com