esakal | हॉकी गोलरक्षक सविताला अखेर नोकरी मिळणार? 
sakal

बोलून बातमी शोधा

Hockey goalkeeper Savita will finally get a job?

दीडशेहून जास्त आंतरराष्ट्रीय लढती खेळूनही हॉकी गोलरक्षिका सविता पुनिया नोकरीच्या प्रतीक्षेत होती, पण आता तिचा हा प्रश्‍न क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्या हस्तक्षेपामुळे सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हॉकी गोलरक्षक सविताला अखेर नोकरी मिळणार? 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई- दीडशेहून जास्त आंतरराष्ट्रीय लढती खेळूनही हॉकी गोलरक्षिका सविता पुनिया नोकरीच्या प्रतीक्षेत होती, पण आता तिचा हा प्रश्‍न क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्या हस्तक्षेपामुळे सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे सविता आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत आहे. तिचे वडील हरियानातील रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करतात. भारतीय महिला हॉकी संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलूनही तिला नोकरीच मिळत नव्हती.

आशिया कप जिंकल्यानंतर मला केंद्र सरकारने नोकरीचे आश्‍वासन दिले होते, पण काहीच घडले नाही. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर सविताची आणि क्रीडामंत्री राठोड यांची भेट झाली. त्या वेळी त्यांनी सविताला आपला रिझ्यूम पाठवण्याची सूचना केली. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीसोबत आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता आपल्याला नक्की नोकरी मिळेल, अशी आशा सविता बाळगून आहे.

नोकरीचा प्रश्‍न सुटण्याची शक्‍यता आहे. हे घडले तर मला आई-वडिलांवर आर्थिक भार टाकण्याची गरज भासणार नाही. मीच घरात काही पैसे देऊ शकेन, असे सविताने सांगितले. भारताकडून खेळत असतानाही तिला गोलरक्षिकेचा सर्व किट घ्यावा लागतो. त्यासाठी घरची मदत आवश्‍यक असते, असेही तिने सांगितले.

loading image
go to top