Hockey WC: ओडिशामध्ये १७ दिवस चालणार हॉकी वर्ल्ड कपचा थरार! सामने कुठे पाहू शकता हे जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Men’s Hockey WC Live Streaming

Hockey WC: ओडिशामध्ये १७ दिवस चालणार हॉकी वर्ल्ड कपचा थरार! सामने कुठे पाहू शकता हे जाणून घ्या

Men’s Hockey WC Live Streaming : आजपासून ओडिशामध्ये पुरुष हॉकी विश्वचषकाची 15 वी आवृत्ती सुरू होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. राउरकेला येथे एकूण 20 सामने खेळले जाणार आहेत. तर कलिंगा स्टेडियमवर उर्वरित 24 सामने होणार आहेत. यजमान भारताला स्पेन, इंग्लंड आणि वेल्ससह ग्रुप-डी मध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: IND vs SL: कुलदीप यादव शेवटच्या ODI सामन्यातून बाहेर! 'या' कारणावरून पडला प्रश्न

हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 देश सहभागी होत आहेत. सहभागी राष्ट्रांची प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गतविजेता बेल्जियम ब गटात जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपानसोबत आहे. ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका हे गट अ गटात आहेत. त्याच वेळी, पूल-सीमध्ये नेदरलँडसह न्यूझीलंड, मलेशिया आणि चिली संघ आहेत.

हेही वाचा: Hockey World Cup: भारताची ४८ वर्षांची प्रतीक्षा यंदा संपणार?

हॉकी विश्वचषकाचे प्रसारण संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया…(When & where to watch FIH Men's Hockey World Cup 2023)

 • हॉकी विश्वचषक कधी आणि किती दिवस खेळवला जाईल?

  13 जानेवारीपासून या लढती सुरू होणार आहेत. अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे.

 • हॉकी विश्वचषक कुठे खेळल्या जाणार आहे?

  हॉकी विश्वचषकाचे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.

 • हॉकी विश्वचषकाचे सामने कोणते टीव्ही चॅनल प्रसारित करणार आहेत?

  हॉकी विश्वचषकाचे सामने भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये कॉमेंट्रीसह सामने पाहू शकता.

 • फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?

  भारतातील हॉटस्टार (डिस्ने+हॉटस्टार) अॅपवर स्पर्धेच्या सामन्यांचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

भारतीय संघाच्या लढती

 • १३ जानेवारी - भारत - स्पेन

 • १५ जानेवारी - भारत - इंग्लंड

 • १९ जानेवारी - भारत - वेल्स

हॉकी विश्‍वकरंडकाची गटवारी

 • अ - अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका

 • ब - बेल्जियम, जर्मनी, जपान, कोरिया

 • क - चिली, मलेशिया, नेदरलँडस्‌, न्यूझीलंड

 • ड - इंग्लंड, भारत, स्पेन, वेल्स