Thane District Kabaddi Tournament
esakal
ठाणे :- होतकरू - अ, जय भारत स्पोर्टस् यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी "खासदार चषक" कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात उपांत्या फेरी गाठली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या महिलांच्या उपांत्यापूर्व सामन्यात होतकरू-अ संघाने समर्थ मंडळाचा प्रतिकार ४२-२४ असा संपवीला. पूर्वार्धात अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात २१-१७ अशी आघाडी होतकरू संघाकडे होती.