IPL मध्ये मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअरची निवड कशी केली जाते?

यंदाच्या आयपीएल १५ व्या सीझनमध्ये मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्ड विजेताचा दावेदार राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू जोस बटलरला मानलं जात आहे.
IPL मध्ये मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअरची निवड कशी केली जाते?
esakal

यंदाच्या आयपीएल १५ व्या सीझनमध्ये मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्ड विजेताचा दावेदार राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू जोस बटलरला मानलं जात आहे. या यादीमध्ये फायनलमध्ये पोहचलेल्या गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन यांचाही समावेश आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2013 च्या सीझनपासून दरवर्षी खेळाडूला मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्ड दिले जाते. यापूर्वी 2008 ते 2012 या कालावधीत आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडूला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला होता.

IPL मध्ये मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअरची निवड कशी केली जाते?

आयपीएलमधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरची रँकिंग एका विशेष रेटिंग प्रणालीच्या आधारे केली जाते. जी खेळाडूंना प्रत्येक चार, षटकार, विकेट, डॉट बॉल, झेल, धावबाद आणि स्टंपिंगसाठी गुण देते. प्रत्येक चारसाठी, खेळाडूला 2.5 गुण, षटकारासाठी - 3.5 गुण, विकेटसाठी - 3.5 गुण, डॉट बॉलसाठी - 1 गुण आणि प्रत्येक झेल किंवा स्टंपिंगसाठी, 2.5 गुण.

IPL इतिहासात MVP पुरस्कार जिंकलेले खेळाडू

2008 शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स)

2009 अॅडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स)

2010 सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स)

2011 ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)

2012 सुनील नरेन (कोलकाता नाइट रायडर्स)

2013 शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स)

2014 ग्लेन मॅक्सवेल (पंजाब किंग्स)

2015 आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स)

2016 विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)

2017 बेन स्टोक्स (रायझिंग पुणे सुपरजायंट)

2018 सुनील नरेन (कोलकाता नाइट रायडर्स)

2019 आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स)

2020 जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स)

2021 हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)

यंदाच्या सीझनमध्ये या यादीत १० खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. 15 व्या आयपीएल हंगामात 376 गुणांसह मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर पुरस्कार जिंकण्याच्या दावेदारांच्या यादीत बटलर आघाडीवर आहे. तर आंद्रे रसेल (281) दुसऱ्या आणि लियाम लिव्हिंगस्टोन (265.5) तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वानिडू हसरंगा (258) चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर प्रसिद्ध कृष्णा (256.5), सहाव्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (246.5).

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (243) सातव्या क्रमांकावर, रविचंद्रन अश्विन (241) आठव्या क्रमांकावर, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (239.5) नवव्या क्रमांकावर आणि कागिसो रबाडा (238) दहाव्या क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com