BCCI : पुरूषांच्या आधी महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; कानिटकर नवा बॅटिंग कोच

Hrishikesh Kanitkar named the batting coach of India womens Senior team
Hrishikesh Kanitkar named the batting coach of India womens Senior teamesakal

Hrishikesh Kanitkar : बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. भारताचा माजी खेळाडू ऋषिकेश कानिटकरला महिला वरिष्ठ संघाचा बॅटिंग कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तो आपल्या पदाचा कार्यभार ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेपासून स्विकारणार आहे. ही मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल. तर महिला क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नवी भुमिका बजावताना दिसणार आहे.

Hrishikesh Kanitkar named the batting coach of India womens Senior team
Shikhar Dhawan VIDEO : ही तर सामान्य गोष्ट... पहिल्या सामन्यातील पराभवावर गब्बरची प्रतिक्रिया

या नव्या नियुक्तीनंतर ऋषिकेष कानिटकरने प्रतिक्रिया दिली की, 'वरिष्ठ महिला संघाचा बॅटिंग कोच होणे ही सन्मानाची बाब आहे. मला या संघात खूप क्षमता दिसत आहे. आपल्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. माझ्या मते हा संघ येणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज आहे. येत्या काही काळात काही चांगल्या स्पर्धा होणार आहे. संघासाठी आणि बॅटिंग कोच म्हणून माझ्यासाठी हा काळ रोमांचकारी असणार आहे.'

याचबरोबर रमेश पोवारने देखील एनसीएमधील आपल्या नव्या भुमिकेविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ अनुभवाने समृद्ध राहिला. गेल्या काही वर्षात मी काही दिग्गज आणि देशातील उगवत्या ताऱ्यांसोबत मिळून काम केले. मी आता एनसीएमधील आपल्या नव्या भुमिकसह नव्या गुणवान खेळाडूंना तयार करण्यात मदत करणार आहे.'

Hrishikesh Kanitkar named the batting coach of India womens Senior team
Michael Vaughan : स्टोक्सच्या कौतुकाचे पूल बांधणाऱ्या वॉनला चाहत्यांनी करून दिली विराटची आठवण

एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, 'रमेश पोवार एनसीएशी जोडला जाणार आहे. मला माहिती आहे की तो त्याचे प्राविण्य आणि अनुभव राष्ट्रीय अकादमीत पणाला लावले. देशांतर्गत, विविध वयोगटातील क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोवारचा अनुभव खूप कामी आला आहे.'

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com