निवृत्ती मागे घेताच अंबाती रायुडू झाला हैदराबादचा कर्णधार

वृत्तसंस्था
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

भारताचा माजी फलंदाज अंबातू रायुडू याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर करुन काहीच दिवस उलचले असताना हैदराबाद संघाने त्याला विजय हजारे करंडकासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे. 

हैदराबाद : भारताचा माजी फलंदाज अंबातू रायुडू याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर करुन काहीच दिवस उलचले असताना हैदराबाद संघाने त्याला विजय हजारे करंडकासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे. 

INDvsSA : रोहतही सलामीला अपयशी ठरला तर हा असेल बॅकअप ऑप्शन

रायुडूने विश्वकरंडकात संधी न मिळाल्याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर मी भावनेत वाहत गेलो मला पुन्हा क्रिकेट खेळायचं आहे असं म्हणत त्याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

हैदराबादचा पहिला सामना 24 सप्टेंबरला कर्नाटकविरुद्ध होईल. रायुडूच्या नेतृत्वाखासी हैदराबाद त्यानंतर साखळी फेरीत गोवा, झारखंड, छत्तीसगड, सौराष्ट्र, मुंबई आणि केलळ यांच्याविरुद्ध खेळेल. हैदराबादचे सर्व सामने बंगळूरमध्ये होतील.

INDvsSA : भारताचा कसोटी संघ जाहीर; केला हा धक्कादायक बदल

यानंतर रायुडूचे लक्ष भारतीय संघात पुनरागमन करण्याचे असेल मात्र, आता ते जवळपास अशक्य दिसत आहे. त्यामुळे किमान देशांतर्गत क्रिकेटमध्ये राहण्यासाठी तरी त्याला हैदराबादकडून चांगला खेळ करावा लागणार आहे. 

हैदराबादचा संघ : अंबाती रायुडू (कर्णधार), भावंका संदीप (उप कर्णधार), पी अक्षत रेड्डी, तन्मय अगरवाल, ठाकूर तिलक वर्मा, रोहित रायुडू, चामा मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, महंमद सिराज. मिकेल जैसवाल, जे मल्लिकार्जुन (यष्टीरक्षक), कार्तिकेय काक, टी रवी तेजा, अजय देव गौड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad Appoints Ambati Rayudu As Captain For Vijay Hazare Trophy