Kane Williamson : ''हैद्राबाद शहर माझ्यासाठी...'' SRH ने साथ सोडताच केन विल्यमसन भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kane Williamson

Kane Williamson : ''हैद्राबाद शहर माझ्यासाठी...'' SRH ने साथ सोडताच केन विल्यमसन भावूक

Kane Williamson : IPL 2023 च्या मिनी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनलाच सोडले आहे. त्याच्यासह स्फोटक फलंदाज निकोलस पूरनलाही संघातून वगळण्यात आले आहे. केन विल्यमसन बराच काळ म्हणजे 2015 मधये सनरायझर्स हैदराबादमध्ये सामील झाला आणि आता आठ वर्षांनंत संघापासून वेगळा झाला आहे. दरम्यान, 2016 मध्ये विल्यमसनने हैदराबादचा भाग असताना आयपीएल ट्रॉफीही जिंकली होती.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

सनरायझर्स संघापासून वेगळे झाल्यानंतर विल्यमसन भावूक झाला आणि त्याने चाहत्यांना आपल्या मनाची गोष्ट सांगितली. त्याने हैदराबादचा संघ, सहकारी खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांचे आभार मानले. तुम्हा सर्वांनी हा प्रवास अधिक सुखकर केल्याचे तो म्हणाला. विल्यमसनने इंस्टाग्रामवर लिहिले की, आठ वर्षांच्या आनंदासाठी फ्रँचायझी, सहकारी खेळाडू, कर्मचारीचे आभार. हा संघ आणि हैदराबाद शहर माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे.

हेही वाचा: IPL 2023 : ''जोपर्यंत धोनी आहे तोपर्यंत कोणीही कर्णधार होऊ शकत नाही'' माजी खेळाडूचा खुलासा

विल्यमसनसाठी आयपीएल 2022 काही खास राहिले नाही. 13 सामन्यांत त्याला 19.64 च्या सरासरीने केवळ 216 धावा करता आल्या. त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले. तसेच यावर्षी त्याने न्यूझीलंडसाठी 12 टी-20 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह 34.72 च्या सरासरीने 382 धावा केल्या आहेत. विल्यमसन आतापर्यंत फक्त हैदराबाद संघाकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या विल्यमसनने 76 सामन्यांमध्ये 36.22 च्या सरासरीने 2,101 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटने 18 अर्धशतके आहेत, ज्यामध्ये 89 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.