
नुकतचं आयपीएल १५ व्या सीझनची सांगता झाली. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. गुजरातने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने नमवून पहिले वहिलं विजेतेपद पटकावले. राजस्थानच्या या पराभवानंतर अनेकांनी आर अश्विनला सल्ले देण्यास सुरुवात केली. अशातच अश्विनने स्वतःच्या खेळीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान अश्विन त्याच्या खेळी संदर्भात बोलत होता. यावेळी त्यानं मॅच नंतर मी कधीही रिव्ह्यू पाहत नाही. असं वक्तव्य केलं. अश्विनच्या मते, प्रत्येक सामन्यातील परफॉर्मंसचे मूल्यमापन करण्याची वेळ निघून गेलीय. तसेच, मागील मॅचमध्ये काय घडलं, परफॉर्मंस कसा होता याचा विचार करत नाही. मी संपूर्ण वर्तमान काळात जगतो. असे अश्विनने यावेळी सांगितलं.
रवी अश्विन म्हणाला की, मी माझ्या कामगिरीचे अजिबात मूल्यांकन करत नाही. आता मी माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर नाही जिथे मी तिथे काय घडले आणि येथे काय झाले याचा विचार करावा. मी रोज जगतो. सध्या मी खूप चांगल्या मानसिकतेत आहे. अशी भावना त्यानं यावेळी व्यक्त केली.
कुमार संगकाराने दिला होता सल्ला
राजस्थानच्या पराभवानंतर त्या टीमचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराने अश्विनला काही सल्ले दिलं. अश्विन एख महान क्रिकेटपटू आहे. पण त्याने ऑफ ब्रेक गोलंदाजी जास्त केली पाहिजे. कसोटीत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आत्तापर्यंत ४४२ कसोटी विकेट घेतल्यात. अश्विन आपल्या गोलंदाजीत सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात अश्विनने ऑफ ब्रेक चेंडूऐवजी कॅरम बॉल जास्त फेकला. त्याने सामन्याच्या तीन ओव्हरमध्ये ३२ धावा दिल्या. पण एकही विकेट काढली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.