WTC फायनलवर इंग्लंडचीच मक्तेदारी; 2023 अन् 2025 चीही फायनल इंग्रजांच्या देशात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Test Championship 2023 And 2025 Final

WTC फायनलवर इंग्लंडचीच मक्तेदारी; 2023 अन् 2025 चीही फायनल इंग्रजांच्या देशात

WTC Final : आयसीसीने 2023 आणि 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्स या इंग्लंडमधील ओव्हल आणि लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जुलै महिन्यात बर्मिंगहम येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सभेवेळी इंग्लंडला दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्सचे आयोजक करण्यात आले होते. 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल देखील इंग्लंडमध्येच झाली होती.

हेही वाचा: ICC Ranking : अव्वल स्थानावर सूर्याचा डोळा! बाबरला टाकले मागे आता रिझवान रडारवर

आयसीसीने 2023 आणि 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कोठे होणार याची घोषणा केली मात्र अजून याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. काही दिवसातच या दोन्ही फायनल्सची तारीख देखील जाहीर केली जाईल. आयसीसीचे सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी 'आम्हाला आनंद आहे की पुढच्या वर्षी WTC फायलनचा आयोजक द ओव्हल असणार आहे. त्यानंतर आम्ही 2025 ची फायनल लॉर्डवर खेळवणार आहोत.' असे वक्तव्य केले होते.

ते पुढे म्हणाले की, 'गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात साऊथम्प्टनमध्ये झालेला अंतिम सामना रोमांचक झाला. मला आशा आहे की जगभरातील क्रिकेट चाहते द ओव्हलवर होणाऱ्या WTC फायनलची वाट पाहत आहेत.' पहिल्या WTC फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती.

हेही वाचा: ICC New Cricket Rule : नव्या नियमांमुळे पाकिस्तानी बॉलर्सनी शोधलेली 'ही' कला लुप्त होणार?

मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) चे सीइओ आणि सचिव गे लेवेंडर यांनी सांगितले की, '2025 ला लॉर्ड्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे यामुळे आम्ही खूप खूष आहोत.' WTC ची दुसरी फेरी ही 4 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ही फेरी पुढच्या वर्षीच्या 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. सद्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत.

Web Title: Icc Announce World Test Championship 2023 And 2025 Final Also Played In England

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..