अमेरिका T 20 वर्ल्ड कपचा यजमान; ICC च्या 8 स्पर्धा आणि 12 देशांची संपूर्ण यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC tournaments.
अमेरिका T 20 वर्ल्ड कपचा यजमान; ICC च्या 8 स्पर्धा आणि 12 देशांची संपूर्ण यादी

अमेरिका T 20 वर्ल्ड कपचा यजमान; ICC च्या 8 स्पर्धा आणि 12 देशांची संपूर्ण यादी

sakal_logo
By
सुशांत जाधव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंगळवारी आगामी आठ स्पर्धांच्या नियोजनासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. येत्या काळात होणाऱ्या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेमध्ये अमेरिकाही यजमानपद भुषविताना दिसणार आहे. 2024 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद हे वेस्ट इंडीज आणि अमेरिका संयुक्तपणे असेल. भारत आणि श्रीलंका 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद भुषवणार आहेत. याशिवाय भारत आणि बांगलादेश 2031 मध्ये वनडे वर्ल्ड कपचे यजमानपद भुषवताना दिसतील.

आयसीसी स्पर्धा आणि यजमान देशांची यादी

2024 T-20 वर्ल्ड कप: अमेरिका आणि वेस्ट इंडीज

2025 चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान

2026 T20 वर्ल्ड कप : भारत आणि श्रीलंका

2027 वनडे वर्ल्ड कप : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया

2028 T20 वर्ल्ड कप: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

2029 चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत

2030 T20 वर्ल्ड कप : इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड

2031 ODI वर्ल्ड कप: भारत आणि बांगलादेश

loading image
go to top