तालिबानमुळे अफगाणिस्तान क्रिकेट धोक्यात, ICC ने घेतला मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

afghanistan cricket
तालिबानमुळे अफगाणिस्तान क्रिकेट धोक्यात, ICC ने घेतला मोठा निर्णय

तालिबानमुळे अफगाणिस्तान क्रिकेट धोक्यात, ICC ने घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
सुशांत जाधव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयावर चर्चा झाली. आयसीसीचा कार्यक्रम निश्चित करण्यासोबतच अफगाणिस्तान क्रिकेटसंदर्भात आयसीसीने मोठे पाउल उचलले आहे. तालिबानी राजवटीमुळे अफगाणिस्तानचे क्रिकेट संकटात सापडले आहे. अफगाणिस्तानमधील क्रिकेटचा आढावा घेण्यासाठी आयसीसीने एक विशेष समिती नेमली आहे. इमरान खान यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समूह समितीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा, रॉस मॅक्युलम, लॉसन नायडू यांचाही समावेश आहे. ही समिती अफगाणिस्तानमधील क्रिकेटचा आढावा घेऊन एक अहवाल तयार करेल आणि तो आयसीसीकडे सूपर्द करेल.

अफगानिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर महिला क्रिकेटवर निर्बंध लादण्यात आले आहेत. महिला क्रिकेटवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या पुरुष संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा एकमेव सामना स्थगित करण्यात आलाय. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले की, 'पुरुष आणि महिला दोन्ही गटातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसी अफगाणिस्तानी संघाच्या पाठिशी आहे. यासाठी आयसीच्या सदस्यांनी नव्या सरकारसोबत याविषयावर चर्चा करणे प्रभावी माध्यम ठरेल.

हेही वाचा: हरभजनच्या संघात भारतापेक्षा पाकिस्तानचे जास्त खेळाडू; पाहा टीम

महिला क्रिकेटसंदर्भात मोठे बदल

आयसीसीने महिला क्रिकेटमध्येही आता प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्लासिफिकेशनला मंजूरी दिलीये. त्यामुळे महिला क्रिकेटला पुरुष क्रिकेटच्या बरोबरीनं आणता येईल, असे आयसीसीला वाटते. आगामी काळात आयसीसी महिला समितीला वूमन्स क्रिकेट समिती या नावाने ओळख दिली जाणार आहे. ही समिती महिला क्रिकेटसंदर्भात घेण्यात येणाऱ्या निर्णयास जबाबदार राहील.

loading image
go to top