Harmanpreet Kaur ICC Ban
Harmanpreet Kaur ICC Ban esakal

Harmanpreet Kaur : आयसीसी हरमनप्रीतला देणार मोठा दणका; एशियन गेम्समधील सहभागावर प्रश्नचिन्ह?

Harmanpreet Kaur ICC Ban : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात अंपायर्सवर जाम भडकली होती. मात्र अंपायर्सवर राग काढणं तिला चांगलंच महागात पडलं होतं. आयीसीसीने तिच्यावर आर्थिक स्वरूपाची दंडात्मक कारवाई केली होती.

मात्र हरमनप्रीत कौरने अंपायर्सविरूद्धची आपली नाराजी सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यावेळी देखील तीव्र स्वरूपात व्यक्त केली. यामुळे बांगलादेशची कर्णधरा निगार सुल्तानाने देखील आपल्या भावना व्यक्त करत टीम घेऊन थेट ड्रेसिंग रूम गाठली होती.

आता या प्रकरणाची आयसीसीने दखल घेतली असून हरमनप्रीत कौरवर सामन्यावेळी केलेल्या वर्तनुकीमुळे किमान दोन सामन्यांची बंदी येऊ शकते. याचा परिणाम तिच्या एशियन गेम्स 2023 च्या सहभागावर देखील होऊ शकतो.

Harmanpreet Kaur ICC Ban
BCCI Media Rights 2023-27 : अखेर नवा ब्रॉडकास्टर मिळणार! बीसीसीआय 12 हजार कोटी रूपये कमवणार?

सामना झाल्यावर हरमनप्रीत कौर म्हणाली की, 'या सामन्यात खूप सुमार दर्जाची अंपायरिंग झाली. काही निर्णय खूपच निराशाजनक होते. ज्या प्रकारची अंपायरिंग होत होती त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले. पुढच्या वेळी आम्ही बांगलादेशमध्ये येऊ त्यावेळी आम्हाला अशा प्रकारच्या अंपायरिंगचा सामना करावा लागले याची जाणीव ठेवून येऊ. त्या प्रमाणे आम्ही तयारी करून येऊ.'

हरमन एवढ्यावरच थांबली नव्हती. तिने बक्षीस वितरण सोहळ्यानंतरच्या फोटो सेशनवेळी बांगलादेशच्या पदाधिकाऱ्यांना अंपायर्सने देखील फोटोसाठी आमंत्रित करा असा खोचक सल्ला दिला होता.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हरमनप्रीत म्हणाली की, 'फक्त तुम्हीच इथे का आहात? अंपायर्सनी तुमच्यासाठी सामना टाय केला त्यांनाही बोलवा. त्यांच्यासोबत देखील फोटो असलेला बरा.'

यावर बांगलादेशची कर्णधार निगार सुल्ताना नाराज झाली आणि तिने आपल्या संघाला घेतलं आणि ड्रेसिंग रूमकडे गेली.

Harmanpreet Kaur ICC Ban
Rishabh Pant IPL 2024 : ऋषभ पंतचा नेटमध्ये सराव, तरी आयपीएलला मुकणार... इशांत शर्मा असं का म्हणतोय?

आयसीसीच्या नियमांनुसार 4 डीमेरिट पॉईंट्स हे दोन सस्पेन्शन पॉईंट्स म्हणून गणले जातात. दोन सस्पेन्शन पॉईंट मिळाले तर खेळाडूवर एक कसोटी आणि दोन टी 20 किंवा वनडे सामन्यांच्या बंदी येते.

हरमनप्रीत पुढचे दोन सामने मुकण्याची शक्यता आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ पुढच्या दौऱ्यात चीनमधील एशियन गेम्समधील सामने खेळणार आहे. त्यामुळे हरमनप्रीतला एशियन गेम्सला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

मात्र हरमनप्रीत कौर याबाबतीत नशीबवान ठरू शकते. कारण एशियन गेम्स हे आयसीसीच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत. त्यामुळे एशियन गेम्ससाठी हरमनप्रीतवरील ही दोन सामन्यांची बंदी लागू होण्याची शक्यता कमी दिसते आहे.

मात्र तिला आयसीसी इव्हेंटचे पुढच्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. मात्र याबाबत आयसीसीने अजून स्पष्टपणे काही सांगितलेले नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com