जय शहांचा समावेश अन् T20 स्पर्धेचा प्रस्ताव; ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची आशा पल्लवित | Cricket In Olympics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket In Olympics 2028

Cricket In Olympics : जय शहांचा समावेश अन् T20 स्पर्धेचा प्रस्ताव; ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची आशा पल्लवित

Cricket In Olympics 2028 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अजूनही 2028 मध्ये लॉस एन्जलीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला जाईल याची आशा आहे. आयसीसीने ऑलिम्पिक आयोजक समितीला सहा संघांच्या टी 20 स्पर्धेची शिफारस केली आहे. दरम्यान, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या होणाऱ्या बैठकीत होणार आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : हे असं भारतात पहिल्यांदाच होतयं... सामन्यानंतर रोहितही झाला आश्चर्यचकीत

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी बीसीसीआय सचिव जय शहा यांचा समावेशी आयसीसी ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचे अध्यक्षपद आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्सले यांच्याकडे आहे. याचबरोबर स्वतंत्र संचालक म्हणून इंद्रा नूरी आणि अमेरिकेचे माजी क्रिकेट अध्यक्ष पराग मराठे यांचा देखील समावेश आहे.

जय शहा यांचा समावेश हा 2036 चे ऑलिम्पिक आयोजन भारतात करण्याच्या दृष्टीकोणातून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीला विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत क्रिकेटच्या सामावेशाबाबतच्या वाटाघाटी करताना जय शहा समितीत असल्याने चांगला प्रभाव पडले.

हेही वाचा: IND vs NZ 2nd ODI : रोहित शर्माचे दमदार अर्धशतक; लंकेपाठोपाठ न्यूझीलंडविरूद्धची मालिकाही खिशात

आयसीसीने सहा संघांच्या टी 20 स्पर्धेचा प्रस्ताव हा किफायतशीर खर्चात स्पर्धा व्हावी यासाठी देण्यात आला आहे. ऑलिम्पिक असोसिएशनचा ते प्रमुख धोरण देखील आहे. क्रिकेट बरोबरच बेसबॉल / सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोसे, ब्रेक डान्सिंग, कराटे, किकबॉक्सिंग, स्क्वाश आणि मोटरस्पोट्स हे खेळ देखील लॉस अँन्जलिस 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश व्हावा यासाठी जोर लावत आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'