Virender Sehwag : सेमी फायनलआधी ICC ची मोठी घोषणा! भारतीय दिग्गज खेळाडूची 'Hall of Fame'मध्ये एन्ट्री

Virender Sehwag ICC Hall of Fame
Virender Sehwag ICC Hall of Fame

Virender Sehwag ICC Hall of Fame : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची गणना जगातील सर्वात आक्रमक सलामीवीर फलंदाजांमध्ये केली जाते. वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वीरेंद्र सेहवागला मोठा सन्मान दिला आहे.

Virender Sehwag ICC Hall of Fame
IND vs NZ Semi-Final: सेमीफायनल पावसाने वाहून गेल्यास काय? जाणून घ्या कोणत्या संघाला होणार फायदा अन्...

सेहवागचा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. सेहवागशिवाय भारतीय महिला संघाची माजी खेळाडू डायना एडुल्जी आणि श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डी सिल्वा यांचाही 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह 'हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण खेळाडूंची संख्या 112 झाली आहे.

वीरेंद्र सेहवाग आणि डायना एडुल्जी यांच्यापूर्वी सात भारतीय खेळाडूंना हा सन्मान मिळाला आहे. 2021 मध्ये विनू मांकड यांना या यादीत स्थान मिळाले. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जुलै 2019 मध्ये हा सन्मान मिळाला होता. राहुल द्रविडला 2018 मध्ये आणि अनिल कुंबळेला 2015 मध्ये हा सन्मान मिळाला होता. बिशनसिंग बेदी आणि सुनील गावसकर यांना 2009 मध्ये उद्घाटन 'ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट करण्यात आले. 2010 मध्ये कपिल देव यांना हा सन्मान देण्यात आला होता.

'हॉल ऑफ फेम'मध्ये भारतीयांचा समावेश

  • 1. बिशनसिंग बेदी- 2009

  • 2. सुनील गावसकर- 2009

  • 3. कपिल देव-2010

  • 4. अनिल कुंबळे- 2015

  • 5. राहुल द्रविड- 2018

  • 6.. सचिन तेंडुलकर- 2019

  • 7. विनू मांकड- 2021

  • 8. डायना एडुल्जी- 2023

  • 9. वीरेंद्र सेहवाग- 2023

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com