T 20 World Cup
T 20 World CupFile Photos

T-20 वर्ल्डकपसंदर्भात ICCने BCCIची मर्जी राखली

बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup ) नियोजनासंदर्भातील निर्णयासाठी अवधी मिळावा, अशी विनंती आयसीसीकडे केली होती.
Summary

बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup ) नियोजनासंदर्भातील निर्णयासाठी अवधी मिळावा, अशी विनंती आयसीसीकडे केली होती.

ICC Meeting: दुबईत पार पडलेल्या बैठकीत आयसीसीने (ICC) बीसीसीआयला (BCCI) दिलासा देणारा निर्णय घेतलाय. आगामी टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात आयसीसीच्या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup ) नियोजनासंदर्भातील निर्णयासाठी अवधी मिळावा, अशी विनंती आयसीसीकडे केली होती. ही विनंती आयसीसीने मान्य केली आहे. टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात आयसीसीने बीसीसीआयला 28 जून पर्यंत डेड लाईन दिली आहे. कोरोनाच्या (Covid-19 pandemic) पार्श्वभूमीवर वर्ल्ड कप भारतात होणार की अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची वेळ येणार याचा निकाल आता 28 जून नंतर समजणार आहे.

T 20 World Cup
पाहुणीच होणार बाबरची नवरी!

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एनआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिलाय. टी-20 वर्ल्ड कपचे नियोजन करण्यासंदर्भात आपल्याकडे 28 जूनपर्यंत मुदत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दुबईत पार पडलेल्या व्हर्चुअल बैठकीत सौरव गांगुलींसह बीसीसीआयचे सचिव जय शहा देखील उपस्थित होते. आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर- नोव्हेबरमध्ये भारतात नियोजित आहे. पण देशातील कोरोनाजन्य परिस्थितीमुळे स्पर्धा भारतात होणार की भारताबाहेर यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे.

T 20 World Cup
ICC CWC Point Table : बांगलादेश टॉपर; टीम इंडिया तळाला

पीटीआयच्या वृत्तानुसार, आयसीसीने बीसीसीआयची विनंती मान्य केली असून पुढील महिन्यातील आयसीसीच्या बैठकीत टी-20 संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. जर देशात कोरोनाची परिस्थिती कायम राहिली तर स्पर्धा युएईमध्ये होण्याचे संकेतही आयसीसीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. या परिस्थितीत आयोजनाचे अधिकार भारताकडेच राहतील, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com