T-20 वर्ल्डकपचं वेळापत्रक; भारताचा पहिला सामना पाकविरुद्ध

T-20 वर्ल्डकपचं वेळापत्रक; भारताचा पहिला सामना पाकविरुद्ध

ICC Men's T20 World Cup 2021 Fixtures revealed : भारताकडे यजमानपद असलेल्या आणि युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर यादरम्यान टी-20 चा थरार रंगणार आहे. आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 24 ऑक्टोबर रोजी लढत होणार आहे.

17 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर यादरम्यान पहिल्या टप्प्यातील पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. यात बांगलादेश, श्रीलंका, आयरलँड आणि नेदरलँडसह आठ संघांचा सहभाग असेल. पात्रता फेरीतील सामने ओमन येथे खेळण्यात येणार आहेत. यातून आघाडीचे चार संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील. 17 ऑक्टोबर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्या सामन्याद्वारे विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे.

पात्रता फेरीचे ग्रुप -

गट अ: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामिबिया

गट ब: बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान

Super12 स्टेजचे सामने 23 ऑक्टोबरपासून दुबई येथे सुरु होणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सकाळी तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सायंकाळी लढत होणार आहे. सहा-सहा संघाचे दोन ग्रुप Super12 चे मध्ये करण्यात आले आहेत.

ग्रुप 1 - : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ए 1, बी 2

ग्रुप 2 - गट 2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बी 1, ए 2

T-20 वर्ल्डकपचं वेळापत्रक; भारताचा पहिला सामना पाकविरुद्ध
Afghanistan Crisis : तालिबानी सत्तेची सूत्रे कोणाकडे?

20 मार्च 2021 मध्ये भारतामध्ये टी-20 चा विश्वचषक होणार होता. मात्र, कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे युएईमध्ये होणार आहे. आयसीसी टी -20 क्रमवारीच्या आधारे गटांची निवड करण्यात आली. ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक) येथे होणार आहे.

भारतीय संघाचं वेळापत्रक -

24 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान

31 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड

3 नोव्हेंबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान

5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध बी 1

8 नोव्हेंबर - भारत विरुद्ध ए 2

या चार स्टेडियमवर रंगणार सामने

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने युएई आणि ओमन येथील 4 स्टेडियमवर खेळवण्यात येतील. यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम, शारजहा आणि ओमन क्रिकेट अकादमी ग्राउंड या स्टेडियमचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com