IND vs AUS Live : भारताचा स्लॉग ओव्हरमध्ये सराव पक्का; ऑस्ट्रेलियाला दिली 6 धावांनी मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC Mens T20 World Cup Australia vs India

IND vs AUS : भारताचा स्लॉग ओव्हरमध्ये सराव पक्का; ऑस्ट्रेलियाला दिली 6 धावांनी मात

IND vs AUS Warm Up Match Live : मोहम्मद शमीने आजच्या सराव सामन्यात फक्त एकच षटक टाकले. ते देखील सामन्याचे महत्वाचे 20 वे षटक. या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. मात्र शमीने फक्त 4 धावात तब्बल तीन विकेट घेत भारताला सामना 6 धावांनी जिंकून दिला. भारताचे 187 धावांचे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात सर्वाबाद 180 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरोन फिंचने सर्वाधिक 76 धावा केल्या.

171-5 : हर्षलने फिंचची केली शिकार

सामना 12 चेंडूत 16 धावा असा आला असताना हर्षल पटेलने 54 चेंडूत 76 धावा करणाऱ्या फिंचचा त्रिफळा उडवत भारताला मोठा दिलासा दिला.

159-4 : अर्शदीपने कांगारूंना दिला चौथा धक्का

अर्शदीप सिंगने मार्कस स्टॉयनिसला 7 धावांवर बाद करत मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला.

145-3  : भुवनेश्वर कुमारने फोडली जोडी

फिंच आणि मॅक्सवेल ही आक्रमक जोडी अखेर भुवनेश्वर कुमारने फोडली. त्याने 16 चेंडूत 23 धावांची खेळी करणाऱ्या मॅक्सवेलला कार्तिककरवी झेलबाद केले.

 फिंचची कॅप्टन्स इनिंग 

अॅरोन फिंचने दमदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले.

युझवेंद्रने मिळवून दिले दुसरे यश

युझवेंद्र चहलने स्टीव्ह स्मिथला 11 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला.

94-1 (10 Ov) : ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाजी

भारताचे 187 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली. जरी मिशेल मार्श 18 चेंडूत 35 धावा करून बाद झाला असला तरी त्याने पॉवर प्लेमधील आपली भुमिका चोख पार पाडली. त्यानंतर कर्णधार फिंचने 32 चेंडूत 41 धावा करत ऑस्ट्रेलियालने 10 षटकात 1 बाद 94 धावा केल्या.

भुवनेश्वर कुमारला मिळाले पहिले विकेट

भुवनेश्वर कुमारने षटकातील पहिल्या 3 चेंडूत 12 धावा दिल्यानंतर मार्शला बोल्ड केले.

ऑस्ट्रेलियाला वेगवान सुरुवात

187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 5 षटकांत एकही विकेट न गमावता 53 धावा केल्या. सध्या मिचेल मार्श 23 धावा आणि कर्णधार अॅरॉन फिंचही 23 धावा करत फलंदाजी करत आहे.

186/7 (20) : सूर्याचे दमदार अर्धशतक मात्र फुलटॉसवर झाला बाद 

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात दमदार अर्धशतक झळकावत भारताला 180 च्या पार पोहचवले. मात्र 20 व्या षटकात तो फुलटॉल बॉलवर बाद झाला. भारताने 20 षटकात 7 बाद 186 धावा केल्या.

हार्दिक पांड्या- विराट कोहली बाद

13व्या षटकात मिचेल स्टार्कने विराट कोहलीला मिचेल मार्शकडे झेलबाद केले. कोहली 13 चेंडूत 19 धावा काढून बाद झाला. हार्दिक पांड्या 14व्या षटकात दोन धावा काढून बाद झाला. त्याला केन रिचर्डसनने टिम डेव्हिडच्या हाती झेलबाद केले.

भारताला दुसरा धक्का, रोहितही आउट

भारताला दुसरा धक्का नवव्या षटकात 80 धावांवर बसला आहे. त्याला अॅश्टन अगरने मॅक्सवेलच्या हाती झेलबाद केले. रोहितला 14 चेंडूत 15 धावा करता आल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या 82/2 आहे.

केएल राहुल आउट

आठव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. केएल राहुल 33 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रीजवर आहेत. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 79 आहे.

राहुलचे अर्धशतक

सात षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता 75 धावा केल्या. केएल राहुलने 27 चेंडूत अर्धशतक ठोकले. तो सध्या 31 चेंडूत 55 धावा तर रोहित शर्मा 11 चेंडूत 14 धावा करत आहे.

राहुलची तुफानी फटकेबाजी

5 षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता 56 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माला तीन षटकेही खाते उघडता आलेले नाहीत. त्याने आतापर्यंत फक्त दोन चेंडू खेळले आहेत. त्याचवेळी, केएल राहुल 25 चेंडूत 49 धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे.

प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहेत

ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (क), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल अर्शदीप सिंग.