ICC ODI Ranking
ICC ODI Ranking esakal

ICC ODI Ranking : प्रिन्स गिलला धक्का, पाकिस्तानच्या माजी कर्णधार रँकिंगमध्ये अव्वल स्थानी

ICC ODI Ranking : नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपदरम्यान, पटकावलेलं अव्वल स्थान फार काळ टिकलं नाही. वर्ल्डकप संपल्यानंतर अवघ्या एका महिन्यात बाबर आझमने पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे.

ICC ODI Ranking
Mohammed Shami : चिराग - सात्विकचा खेल रत्नने सन्मान; वर्ल्डकप गाजवणाऱ्या शमीला अर्जुन पुरस्कार

बाबर आझमने 824 रेटिंग पॉईंट्ससह अव्वस स्थान पटकावलं तर शुभमन गिलचे 810 रेटिंग पॉईंट्स झाले आहेत. शुभमन गिलनंतर या यादीत भारताचे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या रँकिंगमध्ये देखील घसरण झाली असून तो 12 व्या स्थानावर पोहचला आहे. तर केएल राहुल 16 व्या स्थानावर आला आहे.

गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज अव्वल स्थानी कायम असून दुसऱ्या स्थानावर जॉश हेजलवूड आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा तिसऱ्या तर जसप्रीत बुमराह हा पाचव्या स्थानावर आहे. कुलदीप यादव आठव्या स्थानावर आहे.

ICC ODI Ranking
Rohit Sharma : 'सचिनबाबतही यापूर्वी असं झालंय...' रोहितकडून कर्णधारपद काढून घेतल्यावर MI चा ग्लोबल हेड स्पष्टच बोला

भारताचा वर्ल्डकप गाजवणारा मोहम्मद शमी हा गोलंदाजी रँकिंगमध्ये 11 व्या स्थानावर पोहचला आहे. तर रविंद्र जडेजा या यादीत 22 व्या स्थानावर आहे.

अष्टपैलूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन हा अव्वल स्थानावर असून या यादीत भारताचा रविंद्र जडेजा 12 वा तर हार्दिक पांड्या हा 17 व्या स्थानावर आहेत.

टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव हा अव्वल स्थानी कामय असून गोलंदाजीत अदिल राशिद हा अव्वल स्थानावर आहे. ग्रॅम स्वाननंतर आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणारा राशिद हा इंग्लंडचा दुसरा फिरकीपटू ठरला आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com