esakal | ICC Ranking : इंग्लंडला नमवत किवींनी टीम इंडियाला दिला दणका
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand Team

ICC Ranking : इंग्लंडचा नमवत किवींनी टीम इंडियाला दिला दणका

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC Ranking After England vs New Zealand Test Series : बर्मिंघमच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यासह मालिका खिशात घालणाऱ्या किवींनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियालाही मोठा दणका दिलाय. टीम इंडिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायलपूर्वी न्यूझीलंडचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झालाय. इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकत त्यांनी टीम इंडियाच्या जागेवर कब्जा केला. (ICC Ranking After New Zealand Wins Test Series Again England Team India Dropped Down In Ranking Before WTC Final)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथहॅम्प्टनच्या मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. क्रिकेट जगताचे लक्ष लागून असलेल्या मेगा फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ आयसीसीतील नंबर वन बनून आता टीम इंडियाला भिडणार आहे.

हेही वाचा: French Open : लाल मातीत 'नोवा'समोर 'नवा हिरो' फिका पडला!

इंग्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 1-0 अशा विजयामुळे केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या खात्यात 123 रेटिंग पॉइंट्स जमा झाले आहेत. टीम इंडिया 121 रेटिंग पॉइंट्स सह या क्रमावारीत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया (108), इंग्लंड (107) पाकिस्तान (94) रेटिंग पॉइंट्स मिळवून अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. मागील महिन्यात वार्षिक आयसीसी टीम रेटिंगनुसार टीम इंडिया अव्वलस्थानी होती. मात्र आता न्यूझीलंडचा संघ टॉपला पोहचलाय. एकूण गुणांच्या बाबतीत भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा भारी ठरतोय. टीम इंडियाने 24 सामन्यात 2914 अंक प्राप्त केले आहेत. न्यूझीलंडच्या संघाच्या खात्यात 21 सामन्यात 2593 अंक जमा आहेत.

हेही वाचा: EURO : स्टर्लिंगच्या जिवावर इंग्लंडने काढली क्रोएशियाची हवा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पुन्हा अव्वलस्थानी विराजमान व्हायचे असेल, तर न्यूझीलंड विरुद्धची फायनल जिंकावी लागेल. गेल्या काही सामन्यांत टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली असून ते न्यूझीलंडला कडवी टक्कर देतील, असा अंदाज आहे. पण सध्याच्या घडीला न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा वर्चढ ठरतोय. याच कारण म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळलाय. एवढेच नाही तर ते मालिका जिंकून आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे.

loading image
go to top