दुबई - ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यामधील ॲशेस कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न (एमसीजी) येथे पार पडला. हा कसोटी सामना दोन दिवसांतच आटोपला. त्यामुळे चोहोबाजूंनी एमसीजीच्या खेळपट्टीवर टीका करण्यात आली..आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल (आयसीसी) यांच्याकडून एमसीजीच्या खेळपट्टीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. एमसीजीची खेळपट्टी असमाधानकारक व खराब असल्याचा शेरा या वेळी देण्यात आला असून, एक डिमेरीट गुण शिक्षेच्या रूपात त्यांना देण्यात आला आहे. सामनाधिकारी जेफ क्रो यांच्याकडून या खेळपट्टीबाबत अहवाल तयार करण्यात आला..आयसीसीकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले की, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यामधील मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीतील खेळपट्टी असमाधानकारक होती. आमच्याकडून खेळपट्टी व आऊटफिल्डचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर एक डिमेरीट गुणही देण्यात आला..आयसीसीच्या अहवालात पुढे नमूद करण्यात आले की, एमसीजीची खेळपट्टी गोलंदाजांना पोषक अशी होती. पहिल्या दिवशी येथे २० फलंदाज बाद झाले. दुसऱ्या दिवशी येथील खेळपट्टीवर १६ फलंदाज बाद झाले. एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. अशा खेळपट्ट्या नियमात बसत नाहीत. त्यामुळे एक डिमेरीट गुण देण्यात आला आहे..मेलबर्न येथील ॲशेस कसोटी लढत दोन दिवसांमध्ये संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. तसेच टीकाही सहन करावी लागली. २०११नंतर ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवल्यानंतरही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने अशाप्रकारची खेळपट्टी खेळासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट केले..सहा डिमेरीट गुणांनंतर बंदीएखाद्या स्टेडियमला पाच वर्षांमध्ये सहा डिमेरीट गुण मिळाल्यास त्या स्टेडियमवर पुढील १२ महिन्यांमध्ये एकही लढत खेळवण्यात येत नाही. आयसीसीकडून त्या स्टेडियमला १२ महिन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागते. आयसीसीचा हा नियम आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.