esakal | T20 World Cup आधी इंग्लंडला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर! | England Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

England-Cricket-Team

पाठीच्या दुखापतीमुळे मोठ्या स्पर्धेला मुकणार

इंग्लंडला मोठा धक्का; स्टार खेळाडू T20 World Cup मधून बाहेर!

sakal_logo
By
विराज भागवत

लंडन: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या T20 World Cup स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. कंबरेच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे त्याला काही काळ मैदानात खेळता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सॅम करनने बड्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सॅम करनने राजस्थान संघाविरोधात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान कंबरदुखीची तक्रार केली होती.

सॅम करनच्या दुखापतीबाबत अधिक माहिती देताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की त्याच्या दुखापतीबाबत अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात त्याची दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन दिवसात सॅम करन युएईतून इंग्लंडमध्ये परतणार आहे. तेथे त्याच्या अधिक चाचण्या केल्या जातील आणि त्यानंतर त्याच्या दुखापतीचा नेमका अहवाल क्रिकेट बोर्डाला प्राप्त होईल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल टीमकडून त्याच्या दुखापतीवर आणि तंदुरूस्तीवर देखरेख ठेवली जाणार आहे.

loading image
go to top