ICC Test Ranking Pat Cummins
ICC Test Ranking Pat Cumminsesakal

ICC Test Ranking : अवघ्या दोन कसोटीत नाक कापलं गेलं अन् कमिन्सचा रूबाबही गेला, अश्विन मात्र फायद्यात

ICC Test Ranking Pat Cummins : भारताविरूद्धच्या बॉर्डर - गावसकर कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे झुंजार संघ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाची नाचक्की झाली. त्यांनी दोन्ही कसोटीत अवघ्या अडीच दिवसातच नांगी टाकली.

ICC Test Ranking Pat Cummins
Jasprit Bumrah IPL : आयपीएल नाही इराणी ट्रॉफी खेळ... चोप्राने बुमराहवर काढला जाळ

या पराभवाचा फटका ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला देखील बसला आहे. तो तब्बल 4 वर्ष कसोटीतील नंबर 1 गोलंदाज ही बिरूदावली मिरवत होता. ही बिरूदावली इंग्लंडच्या 40 वर्षाच्या जेम्स अँडरसनने काढून घेतली.

आता पॅट कमिन्स थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर भारताचा फिरकीपटू आर अश्विनने ICC Test Bowling Ranking मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

ICC Test Ranking Pat Cummins
Shoaib Akhtar Babar Azam : बाबरची लायकी विराट एवढी नाही; शोएब अख्तरनेच केला पाणउतारा

न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जेम्स अँडरसनने 7 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने 866 रेटिंग पॉईंट्स घेत आयसीसी कसोटी बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात दमदार गोलंदाजी करणाऱ्या अश्विनने एका स्थानाची प्रगती करत 864 रेटिंग पॉईंट्स घेत दुसरे स्थान पटकावले. तर 858 रेटिंग पॉईंट्स घेत पॅट कमिन्स दोन स्थान घसरून तिसऱ्या स्थानावर विसावला.

अश्विन आणि अँडरसन यांच्यातील रेटिंग पॉईंट्समध्ये फक्त 2 गुणांचा फरक आहे. त्यामुळे येत्या काळात अश्विनला अँडरसनला अव्वल स्थानावरून खाली खेचत स्वतः गादीवर बसण्याची संधी आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com