ICC Test Ranking: अश्विन करणार अव्वल स्थानावर कब्जा! अक्षर अन् रोहित फायद्यात

नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी आणि...
icc test ranking latest r ashwin rohit sharma-and-axar patel-top
icc test ranking latest r ashwin rohit sharma-and-axar patel-topsakal

ICC Test Ranking : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने आठ विकेट घेतल्या आणि तो गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याच्या जवळ आहे. अश्विन सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

icc test ranking latest r ashwin rohit sharma-and-axar patel-top
ICC Rankings : टीम इंडियाने रचला 'महारिकॉर्ड'; तिन्ही फॉरमॅटमध्ये बनली नंबर 1 टीम

टॉप रँकिंग असलेल्या पॅट कमिन्सच्या 21 रेटिंग गुणांनी मागे आहे. त्याला 2017 नंतर पुन्हा कसोटीत नंबर वन गोलंदाज बनण्याची संधी आहे. अश्विनशिवाय रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि रोहित शर्मा यांनीही आयसीसी क्रमवारीत स्थान मिळवले आहे.

नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांना याचा फटका सहन करावा लागला आहे.

icc test ranking latest r ashwin rohit sharma-and-axar patel-top
Cheteshwar Pujara 100th Test : पुजाराने शंभराव्या कसोटीपूर्वी घेतला 'विशेष' आशीर्वाद; BCCI नेही केले रिट्विट

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नागपूर कसोटीत चमकदार कामगिरी केली. दोघांनी मिळून 15 विकेट घेतल्या. या दोन खेळाडूंमुळेच भारताला हा सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकता आला.

अश्विनने पहिल्या डावात 42 धावांत तीन तर दुसऱ्या डावात 37 धावांत पाच विकेट घेतल्या. त्याचवेळी जडेजाने पहिल्या डावात 47 धावांत पाच बळी घेतल्या. त्यात स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांच्या मौल्यवान विकेट्सचाही समावेश होता. दुसऱ्या डावात जडेजाने 34 धावांत दोन विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com