ICC Rankings: पंत भाऊचा जलवा! 48 दिवस झाले बॅटला हात लावला नाही तरी पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC Test Rankings 2023 Rishabh Pant

ICC Rankings: पंत भाऊचा जलवा! 48 दिवस झाले बॅटला हात लावला नाही तरी पण...

ICC Test Rankings 2023 Rishabh Pant : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंपैकी एक ऋषभ पंत सध्या रिकव्हरी मोडमध्ये आहे. 30 डिसेंबर 2022ला त्याचा भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये तो थोडक्यात बचावला. पंतला लवकरात लवकर क्रिकेटच्या मैदानात परत यावे त्याच्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. गेल्या 48 दिवसांपासून त्याने बॅटला हातही लावलेला नाही. पंतची कसोटी क्रमवारी कायम आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा कसोटी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने आठ विकेट घेतल्या आणि तो गोलंदाजांच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास पाच महिन्यांनी संघात पुनरागमन करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा 16व्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात जडेजा त्याच्या अष्टपैलू खेळामुळे सामनावीर ठरला होता. अश्विन आणि जडेजा या जोडीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत 15 विकेट घेतल्या, जी भारताने तीन दिवसांत 132 धावांनी जिंकली.

भारताच्या इतर गोलंदाजांमध्ये दुखापतीमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माला नागपुरातील त्याच्या शतकाचा फायदा झाला आणि तो 10व्या स्थानावरून 8व्या स्थानावर पोहोचला आहे.