
ICC Test Team Ranking : असुविधेसाठी क्षमस्व! अखेर ICC ने तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सची मागितली माफी
ICC Test Team Ranking Glitch : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सील अर्थात आयसीसीने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट फॅन्सच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरू केला होता. आयसीसीने बुधवारी भारताला संघाला ICC Test Team Ranking मध्ये अव्वल स्थानावर बसवून औट घटकेचा राजा केलं होतं. त्यानंतर काही तासांनी आयसीसीने काही तांत्रिक कारणामुळे असं झालं होतं सांगत ऑस्ट्रेलियाला परत एकदा रँकिंगच्या अव्वल स्थान बसवून भारताला दुसऱ्या स्थानावर ढकलले.
या खोडसाळपणाबद्दल आता आयसीसीने तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. आयसीसीने आज एक अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करत आपल्या चुकीची माफी मागितली. आयसीसी आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणते, '15 फेब्रुवारी 2023 ला आयसीसीच्या वेबसाईटवर काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे काही काळ भारत अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. आम्ही या असुविधेसाठी माफी मागतो.'
आयसीसी पुढे म्हणते की, 'ऑस्ट्रेलिया हा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. ही रँकिंग झिम्बाब्वे - वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतरची रँकिंग आहे. आता ऑस्ट्रेलिया भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला 126 रँकिंग पॉईंट घेऊन अव्वल संघ म्हणून सामोरा जाईल. भारत 115 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.'
आयसीसी म्हणते की, 'भारत ICC World Test Championship 2021-23 च्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल तर ऑस्ट्रेलिया देखील यासाठीच जोर लावेल. WTC ची फायनल 7 ते 11 जूनला लंडन येथे होणार आहे.'
(Sports Latest News)
हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...