नॅटली एकटी पडली; ऑस्ट्रेलियन महिलांनी सातव्यांदा उंचावला वर्ल्ड कप

ICC Womens World Cup 2022 Australia Women Beat England
ICC Womens World Cup 2022 Australia Women Beat England Sakal

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अपराजित राहत सातव्यांदा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. फायनल लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 50 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 356 धावा केल्या होत्या. एलिसा हिली (Alyssa Healy) हिचे विक्रमी शतक, रिचल हेन्स (Rachael Haynes) आणि बेथ मूनी (Beth Mooney) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंडसमोर 357 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची बॅटर नॅटली सिल्वर (Natalie Sciver) एकटी पडली. तिने 121 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने तिने 148 धावांची नाबाद खेळी केली. पण संघाच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियन महिलांनी 71 धावांनी विजय नोंदवत विक्रमी सातव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली.

इंग्लंडची कर्णधार मेग लेनिंग (Meg Lanning) हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सलामी बॅटरनी फोल ठरवला. एलिसा हिली (Alyssa Healy)आणि रिचेल हेन्स यांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी रचली. रिचेल (Rachael Haynes) 93 चेंडूत 68 धावा करुन माघारी फिरली. इक्लेस्टोन हिने इंग्लंडला पहिलं यश मिळवून दिले. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या बेथ मून हिने 47 चेंडूत 62 धावा केल्या. एलिसा हिलीने वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरे शतक झळकावले. शंभर चेंडूत शतक साजरे केलेल्या एलिसानं 138 चेंडूत 26 चौकाराच्या मदतीने 170 धावा केल्या. या तिघींच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावत निर्धारित 50 षटकात 356 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून अनन्या श्रुबसोल हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीची बॅटर टॅमी ब्युमेंट 26 चेंडूत 27 धावा करुन माघारी फिरली. डॅनिले वॉट अवघ्या 4 धावा करुन माघारी फिरली. ठराविक अंतराने एका बाजूनं विकेट पडत असताना नॅटली स्किव्हर (Natalie Sciver) हिने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. एकाकी झुंज देत तिने शतक साजरे केले. ती मैदानात सहज खेळत असताना दुसऱ्या बाजूनं तिला कुणीही साथ दिली नाही.

1978, 1983 आणि 1988 मध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने सलग तीन वेळा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 1997, 2005 आणि 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंड महिला संघाने 1973 मध्ये पहिल्या हंगामातील वर्ल्डकप स्पर्धेसह 1993, 2009 आणि 2017 या हंगामात वर्ल्ड कप चारवेळा स्पर्धा जिंकली आहे. या दोन संघाशिवाय न्यूझीलंडने 2000 मध्ये बाजी मारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com