भारताच्या पराभवावर हसणाऱ्या कॅरेबियनला रडवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

ICC Womens World Cup 2022 Australia Women Beat West Indies Women
ICC Womens World Cup 2022 Australia Women Beat West Indies Women Sakal

भारतीय संघाच्या पराभवानंतर सेमीच तिकीट मिळाल्यावर जल्लोष करणाऱ्या कॅरेबियन संघावर रडण्याची वेळी आली. ऑस्ट्रेलियन महिला संघाने (Australia Women) पहिल्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजला (West Indies Women) पराभूत करत फायनल गाठली आहे. वेलिंग्टनच्या मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 45 षटकांच्या सामन्यात 305 धावा केल्या होत्या. याधावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ गडबडला. 37 षटकात त्यांना अवघ्या 148 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार स्टेफिन टेलर (Stafanie Taylor) 48 (75) सलामीवीर डेंड्रा डॉट्टिंन (Deandra Dottin ) 34 (35) आणि हेली मॅथ्यूज (Hayley Matthews ) 34(35) यांच्याशिवाय कुणालाही मैदानात तग धरता आला नाही.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतील लढतीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या या पराभवानंतर वेस्ट इंडीजला सेमीचं तिकीट मिळालं होते. भारतीय संघाच्या पराभवानंतर वेस्ट इंडीज संघाने जंगी सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांचा प्रवास आता सेमीफायनलमध्ये संपला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात लढत रंगणार असून यांच्यातील विजेता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फायनल खेळेल.

ICC Womens World Cup 2022 Australia Women Beat West Indies Women
VIDEO : कॅचेस विन मॅचेस; मूनीचा फायनलचं तिकीट पक्क करणारा कॅच बघाच

वेस्ट इंडीज संघाची कर्णधार टेलर हिने पहिल्या सेमी फायनलमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बॅटरनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. एलिसा हिली(Alyssa Healy) नं 107 चेंडूत केलेली 129 धावांची खेळी आणि सलामीची बॅटर रिचल हेन्स (Rachael Haynes) हिने 100 चेंडूत 85 धावा करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी रचली. बेथ मूनीनं (Beth Mooney) 31 चेंडूत नाबाद 41 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या नव निर्धारित 45 षटकात बाद 305 धावांपर्यंत पोहचवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com