
लंडन : पोलंडची २४ वर्षीय टेनिसपटू इगा स्विअतेक हिने विम्बल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या लढतीत रशियाच्या लिऊडमिला सॅमसोनोवा हिच्यावर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम चार फेरीमध्ये प्रवेश केला.