Imran Nazir : 'मला विष देऊन...' पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इम्रान नजीरनं आपल्यावर विष प्रयोग झाल्याचे सांगून वेगळ्याच विषयाला तोंड फोडले आहे.
Imran Nazir
Imran Naziresakal

Imran Nazir former pakistani captain poisoned : पाकिस्तान क्रिकेटविश्व त्यांच्याच एका खेळाडूच्या धक्कादायक वक्तव्यानं चर्चेत आले आहे. तो खेळाडू माजी सलामीवीर असून त्यानं जी गोष्ट सांगितली आहे त्यामुळे पाकिस्तान क्रीडा विश्वात काही आलबेल नाही असे दिसून आले आहे. यासगळ्यात एका खेळाडूनं दाखवलेला दानशूरपणा कौतूकाचा विषय ठरतो आहे.

आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी शाहीद आफ्रीदी चर्चेत असतो. त्याचा जगभरामध्ये चाहतावर्ग आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर इम्रान नजीरनं आपल्यावर विष प्रयोग झाल्याचे सांगून वेगळ्याच विषयाला तोंड फोडले आहे. यापूर्वी देखील इम्राननं केलेल्या खुलाशांनी अनेकांचे लक्ष वेधले गेले होते. आपण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो तेव्हा शाहीद आफ्रीदीनं आपल्याला खूप मदत केल्याचे म्हटले आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शाहिद आफ्रीदी हा त्याच्या दिलदारपणासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे.त्यानं आतापर्यत वेगवेगळ्या खेळाडूंना मोठ्या मनानं मदतही केली आहे. त्याच्या अशाच दर्यादिलीचा प्रत्यय इम्रान नजिरला आला आहे. त्यानं त्याला रुग्णालयात असताना ५० ते ६० लाख रुपयांची मदत केल्याचे दिसून आले आहे. त्याच्या संपूर्ण आजारपणाचा खर्चही त्यानं केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

इम्राननं सांगितलं की, माझी एमआरआय चाचणी झाली तेव्हा माझ्यावर विषप्रयोग झाल्याचे सांगण्यात आले. मर्करी नावाचं विष जे स्लो पॉयझन म्हणून ओळखले जाते त्याचा प्रयोग माझ्यावर करण्यात आला होता. हे विष तुमच्या हाडांमध्ये जाऊन त्याला धोका निर्माण करतं. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून त्यावर इलाज सुरु होते. माझ्यावर कुणी आणि केव्हा विष प्रयोग केला याविषयी मला काहीही माहिती नाही. जे झालं ते खूपच भयानक होते.

मर्करी नावाच्या विषाचा प्रभाव हा सहा ते आठ महिन्यानंतर जाणवायला लागतो. त्यानंतर तुम्हाला कळून येते की तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे. मी देवावर विश्वास ठेवला आणि त्या गंभीर संकटातून मी बाहेर पडलो. मात्र यासगळ्यात माझा खूप खर्च झाला होता. त्यात मला शाहीद आफ्रीदीनं मोठी मदत केली होती.

प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचा उल्लेख करतो की, मला त्यानं खूप मदत केली. ज्यामुळे मी आज या जगात आहे. मी त्याला खूप खूप धन्यवाद देईल. ज्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा त्या व्यक्तीनं मला मदत करुन मोठे उपकार माझ्यावर केले होते. याची मला जाणीव आहे. अशा शब्दांत नजीरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com