
World Boxing Championship : लोवलिना नंतर नितूनेही जिंकला सामना
इस्तंबूलमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने दमदार सुरुवात केलीय. टोकीयो ऑलम्पिकमध्ये ब्रांझ मेडल विजेती लोवलिना बोर्गोहेनने सोमवारी गतविजेती चीनच्या चेन-नेन-चीनचा पराभव केला. आता लोवलिनानंतर भारताने विजयी घौडदौड सुरुच ठेवलीय. 48 किलो गटात भारताच्या नितूने रोमानियाच्या स्चेलयुटा डुटा या अनुभवी खेळाडूचा पराभव केलाय. नितू पहिल्यांदाच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे.
( Women's World Boxing Championship)
नितूने युवा चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. त्यामुळे ४० वर्षीय स्पर्धकावर मात करत नितूने आपला विजय नोंदवला. भारताच्या बॉक्सिंग फेडरेशनने देखील ट्वीट केलंय. त्यामुळे सलग दोन दिवस भारताने चॅम्पियनशिपमध्ये आपलं वर्चस्व राखलंय. पहिल्या राऊंडमध्ये डुटाने आघाडी घेत वर्चस्व राखलं, मात्र नितूने संयमित खेळ करत दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये रोमानियाच्या स्पर्धकाला 5-0 ने पराभूत केलं.
हेही वाचा: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप: ऑलम्पिक पदक विजेत्या लोवलिनाचा चीनच्या बॉक्सरशी लढत
लोवलिनाने 70 किलोगटात अतिशय शानदार खेळ करत तगड्या खेळाडूला हरवलं. ऑलम्पिकनंतर लोवलिना पहिल्यांदा स्पर्धेत उतरली होती. तगड्या खेळाडूला हरवल्यानंतर लोवलिनाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. " ऑलम्पिकनंतर कमकुवत गोष्टींवर लक्ष दिलंय, त्यामुळे मला काय रिझल्ट मिळतायत हे पाहायचंय'', ऑलम्पिकमध्ये खूप शिकता आल्याचंही तिने सांगितलं.
Web Title: In Womens World Boxing Championship Indias Nitu Beats Romaniyan Boxer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..