IND Squad For SA Tour KL Rahul appointed ODI captain for South Africa tour
IND Squad For SA Tour KL Rahul appointed ODI captain for South Africa tour

IND Squad For SA Tour : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाने बदलला कर्णधार? 'या' खेळाडूकडे दिली संघाची धुरा

KL Rahul appointed ODI captain for South Africa Tour : सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्यस्त आहे. ऑस्ट्रेलियासमोर भारतीय युवा संघ आहे, ज्याची कमान सूर्यकुमार यादवकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

IND Squad For SA Tour KL Rahul appointed ODI captain for South Africa tour
India Tour of South Africa : 10 डिसेंबरपासून रंगणार भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली, परंतु अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आणि त्यामुळे भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. भारतीय संघाच्या पराभवानंतर वनडे संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधारपद देण्यात आले आहे.

आफ्रिकेविरुद्धचा दौरा रविवार 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रथम, तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. यानंतर रविवार 17 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. मग दोन्ही संघ लाल बॉल क्रिकेटसाठी मैदानात उतरतील. मंगळवार 26 डिसेंबरपासून या दोघांमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हा दौरा रविवार 7 जानेवारी रोजी संपेल जो दुसऱ्या कसोटीचा शेवटचा दिवस असेल.

टी-20 भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप सिंग, मोहम्मद यादव, अर्शराज यादव मुकेश कुमार, दीपक चहर.

एकदिवसीय : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

कसोटी : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com