IND vs BAN: शुभमन गिल शतक करूनही दुसऱ्या कसोटीत बसणार बेंचवर ?

Shubman Gill Maybe Out India vs Bangladesh 2nd Test Match :
Shubman Gill Maybe Out India vs Bangladesh 2nd Test Match : SAKAL

Shubman Gill Maybe Out India vs Bangladesh 2nd Test Match : बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिलला संघात स्थान मिळाले नाही. या युवा फलंदाजाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली. त्याने या कसोटीत शतक झळकावून आपले इरादे स्पष्ट केले आहे. त्याने दुसऱ्या डावात 110 धावांची अप्रतिम खेळी केली.

शुभमन गिलचे कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला 513 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 150 धावाच करू शकला. टीम इंडियाने 2 बाद 258 धावा करून दुसरा डाव घोषित केला. चेतेश्वर पुजारानेही नाबाद 102 धावा केल्या. तब्बल 4 वर्षांनंतर त्याने कसोटीत शतक झळकावले. याआधी बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता.

Shubman Gill Maybe Out India vs Bangladesh 2nd Test Match :
Hardik Pandya: मोठी घोषणा; टीम इंडियाचा कर्णधार बनण्यासाठी पांड्या सज्ज ?

कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनाने प्लेइंग-11 मध्ये बदल निश्चित आहे. रोहितने पुनरागमन केल्यास चांगली कामगिरी करूनही शुभमन गिलला संघातून वगळावे लागू शकते, असे मत भारताचे माजी दिग्गज खेळाडू संजय मांजरेकर यांना वाटते.

संजय मांजरेकर सोनी स्पोर्ट्सवर म्हणाले की, गिलने शतक केले आणि तोही चांगल्या लयीत दिसत आहे. रोहित शर्मा फिट असेल तर त्याचे पुनरागमन निश्चित आहे, कारण तो कर्णधार आहे. केएल राहुलने पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली नसेल, पण तो संघाबाहेर जाणार नाही. राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार असल्याची माहिती आहे. राहुलच्या अनुपस्थितीत तो पहिल्या कसोटीत संघाची कमान सांभाळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com