Ind vs Afg 1st T20I : शिवम दुबेची तडाखेबाज फलंदाजी, भारताने पहिला सामना घातला खिशात

India vs Afghanistan 1st T20I Live Score Updates News |
India vs Afghanistan 1st T20I News Marathi
India vs Afghanistan 1st T20I News Marathiesakal

India vs Afghanistan 1st T20I :

पहिल्या टी 20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. भारताकडून अष्टपैलू शिवम दुबेने 40 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या तर जितेश शर्माने 31 धावांचे योगदान दिलं. तिलकने 26 तर गिलने 23 धावा केल्या.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला 158 धावात रोखले. भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 42 तर ओमरजईने 29 धावांचे योगदान दिले.

Ind vs Afg 1st T20I Live Score : शिवम दुबेची तडाखेबाज फलंदाजी, भारताची सामन्यावर पकड

मधल्या फळीतील फलंदात शिवम दुबेने दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्याने जितेश शर्मासोबत चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली. जितेश शर्मा 20 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रिंकू सिंहने जवळपास 200 च्या स्ट्राईकरेटने धावा केली. या दोघांनीच सामना 18 व्या षटकात संपवला. शिवम दुबेने नाबाद 60 धावा केल्या तर रिंकूने 9 चेंडूत 16 धावा केल्या.

Ind vs Afg 1st T20I Live Score : भारताची आक्रमक फलंदाजी मात्र अफागणिस्ताननेही दिले धक्के

रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी भारताला 8 षटकात 70 धावांच्या पार पोहचवले होते. मात्र 22 चेंडूत 26 धावा करणाऱ्या तिलकला अझमतुल्लाने बाद केले.

Ind vs Afg 1st T20I Live Score : रोहित ठरला दुर्दैवी, गिलनेही केली निराशा

अफगाणिस्ताने 159 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के बसले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मा शुन्यावर धावबाद झाला. तर शुभमन गिल 12 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.

Ind vs Afg 1st T20I Live Score : मोहम्मद नबीची झुंजार खेळी, अफगाणिस्तानने उभारली आव्हानात्मक धावसंख्या

पहिल्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तानने 20 षटकात 5 बाद 158 धावा केल्या. नबीने सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले तर ओमरजईने 29 धावांचे योगदान दिले. भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमारने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Ind vs Afg 1st T20I Live Score : अफगाणिस्तानला चौथा धक्का

स्लॉग ओव्हरमध्ये अखेर मुकेश कुमारने नबी अन् उमरजईची जोडी फोडली. त्याने उमरजईचा 29 धावांवर त्रिफळा उडवला.

Ind vs Afg 1st T20I Live Score : मोहम्मद नबीनं अफगाणिस्तानचा डाव सावरला

अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीने उमरजाईला साथीला घेत अफगाणिस्तानचा डाव सावरला. त्याने चौथ्या विकेटसाठी 68 धावांची दमदार भागीदारी रचत संघाला 125 धावांपर्यंत पोहचवले.

Ind vs Afg 1st T20I Live Score : अक्षर पटेलने पाठोपाठ धक्के देत अफगाणची टॉप ऑर्डर उडवली

अक्षर पटेलने रेहमत शाहला 3 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. यामुळे अफगाणिस्तानची अवस्था 11 षटकात 3 बाद 65 धावा अशी झाली.

Ind vs Afg 1st T20I Live Score : अखेर अक्षर पटेलने भारताला मिळवून दिलं पहिलं यश

अक्षर पटेलने अखेर अफगाणिस्तानची सलामी जोडी फोडली. त्याने रहमनुल्ला गुरबाजला 23 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर शिवम दुबेने

Ind vs Afg 1st T20I Live Score : पॉवर प्लेमध्ये कोणाचं पारडं राहिलं जड?

पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तानने 6 षटकात 5.5 च्या सरासरीने 33 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानला चांगली सुरूवात करून दिली नाही. मात्र त्यांना विकेट्स घेण्यात अपयश आले. शिवम दुबेने इब्राहीम जादरानला जीवनदान दिलं.

Ind vs Afg 1st T20I Live Score : रोहितने नाणेफेक जिंकली, अफगाणिस्तानची सावध सुरूवात

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या तीन षटकात अफगाणिस्तानला 14 धावाच करू दिल्या.

Ind vs Afg 1st T20I Live Score : रोहितने जिंकली नाणेफेक, यशस्वी अन् संजू बेंचवर

कर्णधार रोहित शर्माने मोहाली टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि आवेश खान यांना संधी देण्यात आलेली नाही. रोहितसोबत शुभमन गिल सलामीला येणार आहे तर तिलक वर्मा हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

Ind vs Afg 1st T20I Live Score : आजपासून रंगणार टी-20 थरार; किती वाजता होणार नाणेफेक?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळला जाणार आहे. आणि या सामन्यातील नाणेफेक संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com