IND vs AUS : आरारा रा खतरनाक! जड्डू भाऊची कडक फिल्डींग म्हणजे विषय संपला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus 1st odi ravindra jadeja

IND vs AUS : आरारा रा खतरनाक! जड्डू भाऊची कडक फिल्डींग म्हणजे विषय संपला...

Ind vs Aus 1st ODI Ravindra Jadeja : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरु झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात रॉकेट वेगानं झाली, पण मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी विकेट्स घेत मोठ्या धावसंख्येच्या आशा धुळीस मिळवल्या.

35.4 षटकांत संपूर्ण संघ अवघ्या 188 धावांत गारद झाला. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने 3-3 विकेट घेतल्या. सामन्यादरम्यान रवींद्र जेडजाचा कडक फिल्डींग पाहायला मिळाली.

रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. जडेजाने आपल्या कारकिर्दीत संघासाठी एकापेक्षा एक झेल, धावबाद आणि अनेक धावा वाचवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा चेंडू कुलदीप यादवने टाकला आणि रवींद्र जडेजाने अप्रतिम झेल घेतला.

पहिल्या डावातील 23 वे षटक कुलदीप यादव टाकत होता. त्याच्या चौथ्या चेंडूवर मार्नसने कट शॉट खेळला जो पॉइंटच्या दिशेने गेला, तेव्हा रवींद्र जडेजा मध्य आला आणि त्याने चेंडू मैदानावर पडण्याआधी पकडला. जडेजाच्या या शानदार झेलमुळे कुलदीप यादवने मार्नस लॅबुशेनची विकेट घेतली. यासोबत वेगवान धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डावालाही ब्रेक मिळाला.